spot_img
spot_img

टँकरची मागणी होताच टँकर उपलब्ध करून द्या-आ. खताळ टंचाई आढावा बैठकीत आ. अमोल खताळ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-पूर्वीच्या काळी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना होते. परंतु पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकारी यांना दिले आहे .त्यामुळे ज्या गावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी होईल त्या गावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश आ . अमोल खताळ यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये आ. अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरातजीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर मुख्याधिकारी रामदास कोकरे तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

आ. खताळ म्हणाले की सध्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई जाणविण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकर कसा उपलब्ध करून देता याची ग्रामसेवक व तलाठी यांनी काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे टँकर कुठल्या गावात कितीवेळा जातात किती खेपा होतात याबाबतचा अहवाल तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना द्या त्यांच्याकडून माझ्या कडे येईल ..अधिकार्यांनी गावातील कुठल्याही राजकीय गटातटात अडकून न पडता पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या जर कोणी पिण्याच्या पाण्या मध्ये राजकारण करत असेल तर त्यांच्या वर कारवाई केली जाईल जिथे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्या ठिकाणचा सर्वे करून त्या गावासाठी किंवा वाडीसाठी तत्काळ टँकर उपलब्ध करून देता येईल याची दक्षता घ्यावी.ज्या गावात कमी लोकसंख्या आहे त्या गावात लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून मदत करण्याची भावना ठेवा. तुम्हाला आमचे कार्यकर्ते जर त्रास देत असेल तर त्यांची तक्रार माझ्याकडे करा. परंतु तुम्ही जर कामात हलगर्जीपणा केला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल अशी तंबी आमदार खताळ यांनी अधिकार्यांना दिली

गेली 40 वर्षापासून या तालुक्यातील जनतेला संघर्ष करावा लागला आहेआता तालुक्यात परिवर्तन झाले आहे.त्यामुळे आपला संघर्ष कमी होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकार्यांने जनतेशी उद्धटपणे न वागता सौजन्याने वागा जर काम होत नसेल तर वरिष्ठांना सांगून बदली करून घ्या. विशेषता महा वितरणच्या संदर्भातील तक्रारी घेऊन आलेल्या जनतेच्या तक्रारी महावितरण चे उपवियंता सोडवणे दूर परंतु ते व्यवस्थित बोलत नाही.त्यांनी जर आपल्या कामात सुधारणा केली नाही तर त्यांची थेट गडचिरोलीला बदली केली जाईल

आ. अमोल खताळ ( सदस्य संगमनेर विधानसभा)

पाणीटंचाई बाबतचा आढावा प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी चारा टंचाईच्या संदर्भातील आढावा पशु सवर्धन विभागाचे अधिकारी कोंडीबा उघडे जलजीवन कामासंदर्भात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन उप अभियंता शैलेजा थिटे महावितरणचे कार्यकारी अभियंताअनिल थोरात ,ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी श्रीरंग गडदे यांनी पाणी  पुरवठाबाबत तसेच तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके यांनी कृषीविषयक योजनांचाआढावा दिला.

संगमनेर तालुक्यात पूर्ण दाबाने विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे महावितरणच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर भाजप उपाध्यक्ष संदीप घुगे भाजप नेते रौफ़ शेख महेश मांडेकर गुलाब भोसले भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे रोहिदास गुंजाळ अमोल दिघे शरद गोर्डे शंकर वाळे गणेश सोनवणे दिनेश फटांगरे अण्णासाहेब ननावरे नामदेव घुले यांनी यावेळी आ खताळ यांच्या समोर महावितरण विभागाच्या अनेक तक्रारी केल्या त्यानंतर लवकरात आपण महा वितरणचे अधीक्षक अभियंता यांची महा वितरणच्या समस्यांवर तोडगा काढण्या साठी बैठक आयोजित केली जाईल असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!