अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- जलसाक्षरता वाढीसाठी आयोजित ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ निमित्ताने जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी व राहुरी तालुक्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, अहिल्यानगर येथे शिबीर संपन्न झाले. संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व अकोले तालुक्यासाठीचे प्रशिक्षण मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे तर श्रीगोंदा, पारनेर, कर्जत व जामखेड तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवाडी या ठिकाणी संपन्न झाले.
प्रशिक्षण शिबीरामध्ये महेश लांजेकर यांनी ई-ऑफीस प्रणालीबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. ई-बिलिंगबाबत राजन लेंगडे यांनी तर ‘गुणवत्ता नियंत्रण’ या विषयावर निवेदिता वाणी यांनी प्रशिक्षण दिले.
यावेळी अधीक्षक अभियंता बी.के. शेट्ये, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, स्वप्नील काळे, कैलास ठाकरे, प्रवीण घोरपडे आदी उपस्थित होते.



