जनता आवाज
टाकळीभान ( वार्ताहर ):- मोबाईलच्या जमान्यात वाचण व लिखान दुर्लक्षित झालेले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचण व लिखानाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डाॅ. श्रीकांत भालेराव यांनी शालेय व महिविद्यालयिन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा हा उपक्रम चांगला व कौतूकास्पद असून हा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे असे प्रतीपादन
साहित्यिक प्रा. डाॅ. बाबूराव उपाध्ये यांनी केले.
टाकळीभान व परीसराची गेली पाच दशके वैद्यकिय सेवा करणारे डाॅ. श्रीकांत भालेराव यांनी पत्नी कै. गौरी श्रीकांत भालेराव यांच्या स्मरणार्थ जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या
स्पर्धेचा बक्षिस वितरण व ९० वर्ष जेष्ठ नागरिकांचा
सन्मान सोहळा श्रीराम मंदिरात संपन्न झाला यावेळी
प्रा. उपाध्ये बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य
टी ई शेळके होते तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. बाबूराव
उपाध्ये, सरपंच अर्चना रणनवरे, माजी सभापती नानासाहेब पवार, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे उपस्थित होते.
प्रास्ताविक डाॅ. श्रीकांत भालेराव यांनी केले. स्वागत कु. डाॅ. सोनल भालेराव यांनी केले तर सुत्र संचालन नवाज शेख यांनी केले.
यावेळी टी ई शेळके, शंकरराव अनारसे, भारत भवार, सुजाता मालपाठक, श्री. औटे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ नागरिक माधव शेरकर, भानुदास हुळहुळे, यशवंत कापसे, मच्छिंद्र शेळके, बाळासाहेब
बनकर, नामदेव मुरकुटे, भास्करराव पवार, सिताबाई कोकणे, सुभद्राबाई लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला तर निबंध स्पर्धेत यश संपादन केलेल्या साक्षी ढोले, कार्तिकी शिंदे, गौरी अमोलिक, सानिया शेख,
प्राजक्ता शिंदे या विद्यार्थिनींना स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी सुजाता मालपाठक, कविता कुलकर्णी, बापूसाहेब पटारे, ज्ञानदेव साळुंके, लहानभाऊ नाईक, रमेश धुमाळ, रावसाहेब मगर, लक्ष्मण कदम, प्राचार्य बी टी इंगळे, सुरेश गलांडे, नारायण काळे, रामकिसन गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, मदन सोमाणी, रतीलाल राजळे, संतोष साबळे, आबासाहेब कापसे, प्रा. बाळासाहेब लेलकर, प्रा. शिवाजीराव बारगळ, मोहन कुकरेजा, सुभाष आंबेकर, सुरेश कोरडे, सुधीर डंबीर, देवडे, होले, शिवाजी शेरकर आदी उपस्थित होते.