spot_img
spot_img

प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये अटल कम्युनिटी डे संपन्न 

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये अटल कम्युनिटी डे उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन शाळेचे प्राचार्य डाॅ बी बी अंबाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अटल लॅबच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोटच्या साह्याने प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थित शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

केंद्र शासनाच्या नीती आयोगाअंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पब्लिक स्कूलमध्ये अटल कम्युनिटी डे विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, नवोन्मेष, सर्जनशीलता, प्रयोगशीलता आणि २१ व्या शतकातील कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी राबवण्यात आला. या अंतर्गत परिसरातील अटल टिंकरिंग लॅब नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अटल टिंकरिंग लॅबमधील नवतंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची आणि सहकार्य व सर्जनशीलता वाढवण्याची संधी प्रदान करण्यात आली. या उपक्रमात ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांची उंची मोजण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण करून दाखवण्यात आले. एल ई डी कोडींगच्या मदतीने उपस्थित विद्यार्थ्यांनी एल ई डी ब्लिंकिंगचे प्रात्यक्षिक केले. अटल लॅबच्या विद्यार्थ्यांनी ए आयचा उपयोग करून अंध व्यक्तींना उपयोगी पडणा-या चष्म्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

अटल कम्युनिटी डे या अनोख्या उपक्रमामध्ये प्रवरा परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरानगर, महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी कन्या विद्यालय प्रवरानगर, तसेच पद्मश्री डॉ विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बाभळेश्वर या शाळांनी आपला यशस्वी सहभाग नोंदवला.

या उपक्रमास शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे,उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अटल टिंकरिंग लॅबचे समन्वयक डि.डी. अरंगळे, राजा इलंडेसरी, सर्व विज्ञान शिक्षक व शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!