20.8 C
New York
Tuesday, August 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

अहमदनगर दि. 26 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा):- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या  यांच्या हस्ते संपन्न झाले.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील  आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी परेडचे निरीक्षण केले.  परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँडपथक, दंगल नियंत्रण पथक, वैद्यकीय पथक, अग्निशामक दलासह विविध चित्ररथांचा समावेश होता.  
            याप्रसंगी पालकमंत्र्यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
            रेसिडेन्सिअल हायस्कुल, चक्रधर स्वामी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,केडगाव, रामकृष्ण इंग्लिश मेडीअम स्कुल व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल, अहमदनगर या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
            कार्यक्रमास सर्व उपजल्हाधिकारी, विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, शाळेंचे शिक्षक, नागरिक यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!