लोणी (प्रतिनिधि)- डॉ.विखे पाटील फाउंडेशन संचलित लिटील फ्लॉवर स्कूलची आज प्रजासत्तादिनी भव्य चित्ररथ फेरी लोणीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. राजधानी दिल्ली मध्ये ज्या प्रमाणे प्रजासत्ताक दिनी भव्या चित्र रथांचे संचालन होते. त्याचीच आठवण आज लोणीत निघालेल्या लिटील फ्लॉवर स्कुलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनीं काढालेली चित्ररथ फेरी पाहिल्यावर झाली. हातात ‘तिरंगा’ घेऊन ‘भारत माता की जय’ म्हणत शेकडो विद्यार्थी शिस्तबध जनजागृती फेरीत सहभागी झाले होते. या चित्ररथामध्ये दिल्ली, केरळा, नागालँड, जम्मू-काश्मिर या राज्यांचे तेथील एकतेचे दर्शन घडविणारे, डोळ्यांचे पारणे फेडणारे पथसंचलन पाहून नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव झाला. दिल्ली राज्याचे सांस्कृतिक महत्त्व विशद करणारा देखावा, आकर्षक वेशभूषा परिधान करून स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका बजावणारे विद्यार्थी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. केरळ राज्याची ओळख असलेल्या कथ्थक नृत्याचा देखावा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणात रंगत आणली होती. नागालँड मधील आदिवासी बांधवांची वेशभूषा व नृत्य कलेचा देखावाही आकर्षक ठरला, तसेच काश्मीरमधील शिकारा बोटीत बसून विद्यार्थ्यांनी गायलेल्या काश्मिरी गीतांनी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता.
या जनजागृती चित्ररथ रॅलीचा शुभारंभ जेष्ठ पत्रकार मनोज आगे, गणेश आहेर यांच्या हस्ते फित कापून झाला. यावेळी पत्रकार कैलास विखे, महेश रक्ताटे, लखन गव्हाणे, गौरव साळुंके आदि उपस्थित होते. या अभुतपूर्व एकता फेरी बद्दल लिटील फ्लॉवर स्कुलच्या प्राचार्या स्वाती खर्डे यांचे लोणीच्या प्रमुख रसत्यावर पालक वर्ग अभिनंदन करून स्वागत करत होते. प्राचार्या स्वाती खर्डे यांच्या कठोर परिश्रमामुळे शिस्तबद्ध व्यवस्थापणामुळे आमच्या विद्यार्थांची शारीरीक मानसीक व बौद्धिक गुणवत्ता वाढत असल्याची प्रतिक्रिया यावेळी पालकांनी व्यक्त केली. या चित्ररथास संस्थेचे चेअरमन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अशोक विखे पाटील, सचिव नंदिनी विखे पाटील, शाळेच्या प्राचार्या स्वाती खर्डे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.