spot_img
spot_img

कारखाना वाचविण्याचा आपला उद्देश, बिनविरोधचा प्रस्ताव आल्यास सहकार्य करू- अरूण तनपुरे

देवळाली प्रवरा( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी येथील डॉ. बाबुराव बाबुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलाय. मात्र इच्छुकांची संख्या बघता आश्चर्य वाटते. पूर्वीचे संचालक आणि आताचे संचालक यात खूप मोठी तफावत असेल. आम्ही मेळावा उशीरा घेण्याचे कारण म्हणजे आम्ही शांतपणाने बघत होतो. कारखान्याचे कर्ज बघता कारखाना सुरू करणे ही तारेवरची कसरत आहे. कारखाना वाचवण्याची आता ही शेवटची संधी आहे. त्यामुळे उद्यापासून आपण जनसेवा मंडळाची एक कमिटी स्थापन करून अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहोत. बिनविरोधचा देखील प्रस्ताव आल्यास आपण पूर्णपणे सहकार्य करू, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले आहे.

आज दि. २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी व्यंकटेश मंगल कार्यालय येथे डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते. प्रसंगी अरूण तनपुरे म्हणाले की, तालुक्याची कामधेनु असणारा हा साखर कारखाना वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. कारखाना वाचवणे हा आपला मूळ उद्देश आहे. ज्या प्रमाणे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालवून ही संस्था आपण नावारुपाला आणली. त्याच प्रमाणे आपण राहुरी साखर कारखाना देखील सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करू. सध्या कारखान्यांवर जिल्हा बॅकेचे १५० कोटी कर्ज आहे. या वितीरीक्त अजुन देखील खुप देणी आहेत. अशी एकूण सुमारे ६०० कोटींची देणी आहेत. त्यामुळे यापुढे कारखाना हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ. असे अरुण तनपूरे म्हणाले.

यावेळी अण्णासाहेब चोथे, रविंद्र मोरे, बाबासाहेब भीटे, प्रकाश देठे, बाळासाहेब पेरणे, विक्रम गाडे, किशोर जाधव, दिलीप इंगळे, दत्तात्रय कवाणे, मच्छिंद्र सोनवने, विजय तमनर, मोकाटे गुरूजी आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. तर व्यासपीठावर रविंद्र आढाव, बाळासाहेब खुळे, आण्णासाहेब चोथे, विक्रम भुजाडी, विजय डौले, हर्ष तनपूरे, बाळासाहेब आढाव, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, संतोष आघाव, सुरेश निमसे आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुरी तालुक्याची कामधेनू असणारा डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत आहे. सध्या राजकारण न करता, गट-तट, पक्ष, विरोधक न बघता कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र बसुन निर्णय घ्या. आणि हा कारखाना सुरू करा. असे मत प्रेरणा पतसंथेचे अध्यक्ष सुरेश वाबळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!