गुहा( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील तांभेरे रोडवरील वाबळे वस्तीवरील श्री साईबाबा मंदिर येथे शुक्रवार दिनांक 18 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 या कालावधीत साई सच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पारायणाचे हे चौथे वर्ष आहे. वाबळे वस्ती येथे श्री साई मंदिर असून दररोज पूजा आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पारायण सोहळ्यास परिसरातील भाविक भक्त तरुण सहभागी होत आहे.
दरम्यान शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत महंत ह भ प उद्धव महाराज मंडलिक (नेवासेक) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद वाटपाने पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई भक्त व समस्त वाबळे परिवार यांच्या कडुन करण्यात आले आहे.