22.2 C
New York
Tuesday, August 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

अभिनेते शंतनू मोघे 2 फेब्रुवारी रोजी नवलेवाडीत..

कोल्हार( जनता आवाज प्रतिनिधी ):-
 स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते शंतनू मोघे गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता अकोले तालुक्यातील नवलेवाडी च्या लौकिक प्राप्त अभिनव शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ.अनिल बेंद्रे यांनी दिली.
 अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रेस क्लब प्रवराचे उपाध्यक्ष पत्रकार प्रमोद कुंभकर्ण हे आहेत. 
अभिनव महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमात  विविध विषयात व कलागुणात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सुप्रसिद्ध अभिनेते शंतनु मोघे यांच्या हस्ते  पारितोषिक देऊन सन्मान केला जाणार आहे. 
शंतनु मोघे हे अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव असून गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांचे पुतणे  आहे  अभिनेते शंतनू मोघे यांनी अनेक टीव्ही मालिका,चित्रपट व नाटकातून विविध प्रकारच्या भूमिका केल्या असून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली.
 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!