spot_img
spot_img

कोल्हार येथे साई सच्चरित् पारायण सोहळा 

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार येथे गुरुवार दिनांक 1 मे ते शुक्रवार दिनांक 9 मे 2025 दरम्यान साई सूर्योदय ग्रुप,तीन चारी आयोजित श्री साई सच्चरत् पारायण सोहळ्याचे कै. विठ्ठलमामा निबे वस्ती,तीनचारी, राजुरी रोड, कोल्हार बु येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत साईंची आरती व ग्रंथ वाचन होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे ह भ प बापूसाहेब महाराज बोऱ्हाडे तिसगाववाडी हे यावर्षीच्या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक आहेत. दरम्यान शुक्रवार दिनांक 9 मे रोजी सकाळी 7.30 वा. ग्रंथ अवतरणिका व भव्य पालखी मिरवणूक होणार असल्याचे आयोजन कर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. पारायण सोहळ्याची यंदाचे हे 14 वे वर्ष आहे. नवीन पारायण करताना ग्रंथ वाटप करण्यात येईल तसेच जुन्या पारायण करतांनी आपले ग्रंथ बरोबर घेऊन यावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले दरम्यान शुक्रवार दिनांक 9 मे रोजी पारायण सांगतेच्या दिवशी

झी टॉकीज फेम ह भ प रोहिणी ताई परांजपे यांचे काल्याचे किर्तन होणार असुन त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी पारायण वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई सूर्योदय ग्रुप तीनचारी तर्फे श्री विजय डेंगळे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!