4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा उपक्रमा अंतर्गत शिर्डी विधानसभा मतदार संघातील विविध शाळांमध्ये आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत १६ केंद्रामधून ४ हजार५१५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

लोणी दि.दि.२४ प्रतिनिधी
परीक्षेच्या सर्व वातावरणातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा उपक्रमा अंतर्गत शिर्डी विधानसभा मतदार संघातील विविध शाळांमध्ये आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत १६ केंद्रामधून ४ हजार५१५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रवरा कन्‍या विद्या मंदिर, प्रवरा पब्लिस स्‍कुल, प्रवरा सैनिकी स्‍कुल, यशवंतराव चव्‍हाण कनिष्‍ठ महाविद्यालय राजुरी, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय बाबळेश्‍वर, कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्‍ट महाविद्यालय आश्‍वी खुर्द, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय पाथरे बु. महात्‍मा फुले विद्यालय व कनिष्‍ट महाविद्यालय दाढ, कला, विज्ञान व वाणीज्‍य महाविद्यालय राहाता, पद्मश्री विखे पाटील कनिष्‍ट महाविद्यालय लोणी, भगवती माता विद्यामंदिर व महाविद्यालय कोल्‍हार भगवती, प्रवरा हायस्‍कुल कोल्‍हार. तसेच गणेश शिक्षण संस्‍थेच्‍या वाकडी, केलवड, रुई, पिंपळवाडी येथील शाखांमध्‍ये या भव्‍य चित्रकला स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले होते.
स्पर्धे करीता विद्यार्थांना विविध राष्ट्रीय आणि सामाजिक विषय देण्यात आले होते.या विषयांना अनूसरून विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना चित्राच्या माध्यमातून रेखाटल्या.शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणात यासाठी नियोजन करण्यात कले होते. शिक्षकांचा सहभाग या स्पर्धेत उत्सूर्त होता. स्पर्धक विद्यार्थ्यांना ‘प्रवरा  माय इंडीया’ ‘जी २० नमो’ आशा आकारत बसविण्यात आले होते. स्पर्धेसाठीची ही रचना सर्वाचे लक्ष वेधून घेणारी होती. पहील्या तीन विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून स्थानिक पदाधिकारी आणि भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!