spot_img
spot_img

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आंबरे डेंटल केअरचा मोठया दिमाखात शुभारंभ

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर येथील शांत सुसंस्कृत कुटुंबातील .प्रा.जनार्दन राघुजी पा.आंबरे यांच्या उच्चशिक्षित  स्नुषा डॉ.गायत्री ऋषिकेश आंबरे यांच्या आंबरे डेंटल केअरचा कोल्हार भगवतीपुरमधील सोनगाव रोड येथील जिल्हा परिषद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बुधवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वा. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला. यावेळी डॉ. गायत्री आंबरे यांचे ना.राधाकृष्ण विखे साहेब यांनी कौतुक करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छारुपी आशीर्वाद दिले.

याप्रसंगी आंबरे परिवारातर्फे ना.राधाकृष्ण विखे साहेबांचा व डॉ.भास्कर खर्डे पाटील यांचा ऋषिकेश आंबरे यांनी शाल,श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ञ  डॉ.  आनंद पिंपळकर, आनंदी वास्तू विमान नगर पुणे हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष  डॉ. भास्करराव खर्डे पाटील होते.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे , प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव वाबळे, कृषिभूषण उद्योजक राजेंद्रशेठ कुंकलोळ,राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक रावसाहेब शंकरराव तनपुरे पा.,पद्मश्री विखे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक श्रीकांत खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे,स्वप्निल निबे,धनंजय दळे, साईनाथ खर्डे, पंढरीनाथ खर्डे, पशु मत्स्य विद्यापीठ नागपूरचे कार्यकारणी सदस्य ऋषिकेश खांदे भगवतीपुर ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजभोज उपसरपंच प्रकाश खर्डे भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त अजित मोरे, वसंत खर्डे, अक्षय मोरे, गणेश गागरे,आसिर पठाण,सुनील बोरुडे, आंबरे पाटील आप्तेष्ट,मित्र परिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आंबरे परिवाराकडून आलेल्या सर्वांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!