spot_img
spot_img

निळवंडे दोन्ही कालव्यांना ना विखे आणि आ. खताळ यांच्यामुळे भर उन्हाळ्यात पाणी – देशमुख

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- ज्यांना चाळीस वर्षात या तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेला पाणी न देता तहानलेला ठेवण्याचे पाप केले आहे ,तसेच माय माऊलीच्या डोक्यावरचा हंडा उतरवता आला नाही तेच पाण्यावर जर राजकारण करत आहे हे फार मोठे दुर्दैव आहे त्यांच्या बंधुंनी सर्वप्रथम तालुक्यात निर्मिती कंट्रक्शनच्या माध्यमातून निर्माण केलेल्या रस्त्यांचे खड्डे बुजवून या तालुक्यामध्ये खड्डेमुक्त रस्ते तयार करून दिलासा द्यावा.मंगच पाण्यावर राजकारण करावे अशी टीका करत या तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम जलसंपदामंत्री तथा पालकमंत्रीराधाकृष्ण विखे पा आणि आमदार अमोल खताळ यांनी केले असल्याचे रोखठोक मत भाजपचे माजी उपाध्यक्ष व आ अमोल खताळ यांचे खंदे बापूसाहेब देशमुख यांनी ठणकावून सांगितले

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देशमुख म्हणाले की केली ४० वर्षापासून या तालुक्यावर एक हाती सत्ता असणारे लोकप्रतिनिधी अन माजी मंत्र्यांचे ठेकेदार बंधू सध्या तालुक्यात पाण्याचे राजकारण करताना दिसत आहेत. निळवंड्याचे शेती साठी२० एप्रिलपासून ४० दिवस आवर्तन सुरू आहे. सर्वप्रथम हे पाणी डाव्या व उजव्या कालव्यांच्या टेलपर्यंत गेले पाहिजे.

या दृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. ते पाणी टेलपर्यंत पोहचल्या नंतर संगमनेर तालुक्यातील सर्व गावा तील ओढे नाले बंधारे भरून घेणेबाबत आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत. परंतु हीच गोष्ट माजी मंत्र्यांचे बंधू यांना रुचलेली दिसत नाही. त्यांनी आता निळवंडे पाण्याचे राजकारण सुरू केले आहे. मुद्दाम खाली पाणी जाऊ नये म्हणून पाणी सुटल्यावर प्रत्येक गावात जास्त पाईप टाकून व खाजगी जनरेटर बसून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उचलुन खाली पाणी जावू न देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांशी पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा करून सर्वांना पाणी कसे समान मिळेल यासाठी प्रयत्न न करता त्यांनी या पाण्याचे राजकारण सुरू केले असल्याची टिका देशमुख यांनी केली

निळवंडेच्या दोन्ही कालव्यांमधून पाणी ओढे,नाले व गाव तळे भरून घेण्यासाठी जे पाईप टाकले जातात ते पाईप कारखा न्याचा ऊस उत्पादक शेतकर्याच्या हक्का च्याच उसातून कपात केलेलाभागविकास निधीतून खर्च केला जात आहे.हा फंड कोणाचा प्रायव्हेट नसतो. किंवा पाईपचा खर्च निर्मितीचा अकाउंट मधून केला जात नाही तेव्हा स्वतःच्या खिशा तून पाईप टाकल्याचा तोरात माजीमंत्र्यांच्या बंधूनी राहू नये अशी ही टीका देशमुख यांनी केली

संगमनेरचे माजीमंत्री छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री असताना या तालुक्या च्या माजी मंत्र्यांनी अहिल्या नगर नाशिक व मराठवाडा सामन्यायी पाणी वाटप वाद यांच्यामुळेच सुरू झाला. संगमनेर तालु क्यातील हक्काचे पाणी उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करून तालुक्यातील शेतकर्यांवर अन्याय करत तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कोणाच्या कंपनीसाठी आणि कोणाच्या शेकडो एकर जमिनी साठी जायकवाडी नेले होते? हे संगमनेर तालुक्यातील जनता विसरलेलेली नाही.अशी टीका बापूसाहेब देशमुख यांनी केली

ज्या माजी मंत्र्यांच्या बंधूंने या तालुक्या मध्ये बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणारी टोळी तयार करून कोट्या वधीचा भ्रष्टाचार केला . त्यांनी आता जिल्हा परिषद ,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूकित पराभव दिसत आहे म्हणून हे लोक तालुक्यात पाण्याचे राजकारण करत असल्याची जोरदार टीका देशमुख यांनी केली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!