राजूर( जनता आवाज वृत्तसेवा):-कावीळ साथरोग रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.डॉक्टरांची टिम पूर्णवेळ थांबणार असून, रक्त तपासणीचे अहवाल तातडीने मिळण्यासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.राजूरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्वच पाण्याचे स्त्रोत तपासण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राजूर येथील कावीळच्या साथरोगाच्या कारणाने रूग्णांची संख्या २६३ इतकी झाली आहे.दोन रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री ना.विखे पाटील आ.किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे,प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी राजूर येथे येवून ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेबाईकांची भेट घेतली. डाॅक्टरांकडून त्यांनी सूरू असलेल्या उपचारांची माहीती जाणून घेतली.
राजूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामस्थ आणि रूग्णासाठी उपचारांची विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.येथेही मंत्री विखे पाटील भेट दिली.उपस्थित ग्रामस्थ उपचार घेण्यासाठी आलेले रूग्ण तसेच वैद्यकीय यंत्रणेतील कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांनी माहीती घेवून सूचना केल्या.रूग्णामध्ये मुल आणि मुलींची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आहराबाबत तज्ञाकडून मार्गदर्शन घेण्याबरोबरच पालकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी संमुपदेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रकल्प कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या.प्रामुख्याने ग्रामपंचायती कडून झालेल्या दुर्लक्षामुळे पाणी पुरवठा दूषित झाल्याची तक्रार करण्यात आली.याची गंभीर दखल घेवून पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांंना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.
तलाठी ग्रामसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी थांबत नसल्याची बाब बैठकीत सांगण्यात आली.याबबातही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकर्यांना सूचना करून प्रशासनातील सर्व विभागांना साथ रोग कमी होईपर्यत मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यास सांगितले आहे.
गावातील सर्व कुटूंबियाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी कोव्हीड संकटाप्रमाणे आशा सेविका सक्रीय करून घ्यावे.राजूर गावासह शेजारील गावांचेही सर्व्हेक्षणही करण्याबरोबरच पाण्यात टाकण्यासाठी लागणारे जंतूनाषक औषध ,तसेच रक्त तपासणीच्या अहवलाकरीता लागणारी यंत्रणा जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सूचित केले.
रुग्णांचे रक्त नमुन्यांचे अहवाल उशिरा उपलब्ध होत असल्याने प्रवरा मेडीकल ट्रस्टचे पथक पाठविण्यात आले असून,उपचार करण्यासाठी पथकाने काम सुरू केले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.राजूर येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारांची सुविधा सूरू करण्यात आली आहे.
राजूर येथे दुषित पाण्यामुळे ओढवलेल्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या पाण्याचे स्त्रोत तपासण्याबाबत प्रशासानाने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
हे संकट रोखण्याची जबाबदारी सर्वाची असल्याने ग्रामस्थ आणि प्रशासनाने समन्वय राखून काम करण्याच्या सूचना बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.



