3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश

अहमदनगर, २२ जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) – विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळया प्रकारच्या परवानग्या तात्काळ प्राप्त करुन घेण्यासाठी तालुका स्तरावर तहसील कार्यालयात एक खिडकी सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी निर्गमित केले आहेत. 
चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहिर सभेच्या परवानगी – संबंधित कार्यक्षेत्राचे पोलीस अधिकारी,  पोस्टर्स/झेंडे सभेच्या ठिकाणी लावण्याची परवानगी – नगरपरिषद मुख्याधिकारी/ग्रामसेवक,  खासगी जागेवर जाहिरात फलक परवानगी-  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था,  प्रचार वाहन परवानगी – अहमदनगर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रचार कार्यालय, मिरवणुका/रोड शो/रॅली/, ध्वनीक्षेपकाची परवानगी –  संबंधित कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी,  मतदांनाच्या दिवशी उमेदवारांचे निवडणुक बुथ परवानगी – तहसीलदार/नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे दिली जाईल. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे विविध परवाने या एक खिडकी सुविधा कक्षाच्या माध्यमातून तहसील कार्यालयातून दिले जातील. 
तालुका स्तरावर नागरी भागासाठी मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवार / त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना या कामी नेमलेल्या सक्षम अधिका-यांकडून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आवश्यक त्या परवानग्या तात्काळ देण्यात यावेत.नगर परिषद / नगरपंचायत / ग्रामपंचायत यांचे नाहरकत प्रमाणपत्र त्याच ठिकाणी उपलब्ध होण्याकरीता संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांनी त्यांचे कार्यालयातील एक जबाबदार अधिकारी नेमून नाहरकत प्रमाणपत्र उमेदवार / त्यांचा निवडणूक प्रतिनिधी यांना तात्काळ उपलब्ध करुन दयावेत. तालुका स्तरावरुन दिलेल्या परवानगीबाबत दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय ( आचार संहिता कक्ष ) अहमदनगर यांचेकडेस ई मेलवर न चुकता सादर करावा.असेहीआदेशात जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी नमूद केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!