लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी डॉ.सुजय विखे पाटील आणि व्हा.चेअरमन पदावर सोपान शिरसाठ यांची एकमताने निवड करण्यात आली.
कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली. चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाच्या निवडी करीता नविन संचालकांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नावाची सूचना संचालक सुनिल तांबे यांनी मांडली त्यास संचालक अशोक घोलप यांनी अनुमोदन दिले.
व्हा.चेअरमन पदाकरीता संचालक सोपान शिरसाठ यांच्या नावाची सूचना किरण दिघे यांनी मांडली त्यास संचालक अनिल भोसले यांनी अनुमोदन दिले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नूतन पदाधिक-यांच्या नावाची घोषणा करून नविन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकारी, संचालकांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती स्थळावर जावून अभिवादन केले.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अनेक चढ उतार आले. मात्र सर्वांंनी एकत्रितपणे काम करून त्यावर मार्ग काढला. आव्हानात्मक परीस्थितीत सभासदांना चांगला भाव आपल्या कारखान्याने दिला. शेतकरी सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा मंत्र पद्मश्रीं डॉ.विखे पाटील आणि आणि आदरणीय खासदार साहेबांनी आपल्या सर्वाना दिला. त्या विचाराने काम करून सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यंदाची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जनसेवा मंडळाच्या जेष्ठ नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शना बद्दल त्यांनी आभार मानले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात पदाधिकरी आणि संचालकांचे अभिनंदन करून बिनविरोध निवडणूक करून सहकार चळवळीत आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.कारखाना प्रगती पथावर आहे.ऊसवाढीसाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नूतन चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी सर्वाचे आभार मानून कठीण काळात चांगले काम करून उच्चांकी गाळप आणि सभासदांंना चांगला भाव देण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक आबासाहेब खर्डे कैलास तांबे,डॉ भास्करराव खर्डे तुकारम बेंद्रे आण्णासाहेब भोसले,अण्णासाहेब कडू, नंदकिशोर राठी,सुनिल जाधव,मच्छींद्र थेटे आदीनी सर्व नविन पदाधिकार्याचे अभिनंदन केले.