कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव शहरातील रेव्हेन्यू कॉलनीच्या जवळच राहणारे डॉ. विवेकानंद वामनराव सूर्यवंशी हे बाहेरगावी गेल्याने घरात कोणी नाही याचा फायदा घेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास भामट्यांनी घराचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून घरातील कपाटाची उलथा पालत करून त्यामध्ये मिळून आलेले ३ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम व २ तोळ्याचे सोन्याचे दागिने त्यामध्ये रिंगा, सोन्याची चैन, कानातील टॉप्स अशा सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर सदर भामट्यांनी हात मारला असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत डॉ. विवेकानंद सुरवंशी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये २४८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३),३३१(४),३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करत आहे.



