करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ):-पाथर्डी तालुक्यातील गुरु आनंद तीर्थस्थळ चिचोंडी व नगर तालुक्यातील भैरवनाथ देवस्थान आगडगाव यादोन्ही तीर्थस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी सीआरएफ फंडा अंतर्गतनिधी देण्याची मागणी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे.
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ हे राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांचे जन्मस्थान आहे त्यामुळे वर्षभर देशभरातून भाविक भक्त या ठिकाणी येतात तसेच आगडगाव येथील काल भैरवनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून देशभरात नावारूपाला आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वर्षभर भाविकांची रीघ असते म्हणून या तीर्थस्थळांना जोडणारे रस्ते उच्च दर्जाचे व दुपदरी असावेत जेणेकरून महामार्गांवरून या तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी खोसपुरी ते चिचोंडी शिराळ जेऊर ते चिचोंडी शिराळ व भुईकोट किल्ला ते आगडगाव मार्गे मिरी या रस्त्यांसाठी आज केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे भरीव निधीची पत्राद्वारे मागणी केली.सदर रस्त्यांसाठी लवकरच निधीची तरतूद करून ही कामे मंजूर करण्यात येतील असे आश्वासन नामदार नितीनजी गडकरी यांनी यावेळी दिले.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर राहुरी नगर या तालुक्यातून जाणारा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग या रस्त्याचे केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु या भूसंपादनाचा कोणताही मोबदला अद्याप पर्यंत संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही तसेच या रस्त्या अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शिक्के पडल्यामुळे शेतकऱ्यांना या जमिनी बाबत कोणतेही खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे करता येत नाहीत त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत सापडलेले आहेत म्हणून लवकरात लवकर सदर निवाड्यांप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला मिळणे कामी ही प्रशासनाला आपल्या मार्फत आदेश व्हावेत अशी विनंती आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे.



