कर्जत ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कर्जत येथील लग्नामधील गर्दीचा फायदा घेत मंगल कार्यालय मधून दोन लाख ६१ हजार २२५ रुपयांची सोन्याचे दागिने चोरीला जाण्याची घटना कर्जत मध्ये घडली आहे.
आता चोरट्यांनी दागिने चोरी करण्यासाठी नवीन फंडा आणलेला आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी मंगल कार्यालय मध्ये जाऊन दागिने चोरण्याची घटना सातत्याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडत आहे. असाच प्रकार कर्जत येथे देखील घडला आहे.
कर्जत येथील मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणावरून तब्बल दोन लाख 61 हजार 225 रुपयांचे दागिने चोरुन नेण्याची घटना सहा तारखेला दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी सात तारखेला सायंकाळी चार वाजता कर्जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुदर्शन संतोष शिंदे राहणार भांडेवाडी तालुका कर्जत यांनी फिर्यादी दिली की, कर्जत शहरातील कुळधरण रोड वर असणाऱ्या मातोश्री मंगल कार्यलय येथे लग्न समारंभ होता. यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीचे नातेवाईक असणाऱ्या छाया कैलास चाकणे राहणार चांडगाव, तालुका श्रीगोंदा यांनी पर्समध्ये ठेवलेले दोन लाख 61 हजार 225 रुपयांचे सोने चांदीचे दागिने आज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भात नातेवाईकांना माहिती दिल्यावर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध लावण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.



