जामखेड( जनता आवाज वृत्तसेवा ): –महासाध्वी रत्ना, आनंद-उज्वल-प्रमोद कुलच्या जेष्ठ साध्वी, श्रमण संघीय उपप्रवर्तिनी, डॉ, पू, श्री, प्रियदर्शनाजी म, सा, ( छोटे बाई म, सा, ) यांना रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्याने अहिल्यानगर येथे विराजमान असलेले महाराष्ट्र प्रवर्तक पू श्री, कुंदनॠषिजी म, सा, यांनी कोथरूड जैन श्रावक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोबाईल फोन वरुन आपल्या मुखारविंदाने सजग अवस्थेत सकाळी साडे नऊ वाजता संथारा व्रताचे पचक्खाण दिले.
महासाध्वी ह्या ८६ वर्षांच्या असून त्या कोथरूड येथील मयुर काॅलनी मधील जैन स्थानक भवन येथे विराजित आहेत, त्यांच्या सेवेसाठी अनेक साध्वी गण उपस्थित असून अनेक साधुसंत येत आहेत, महासतीजींच्या दर्शनासाठी पुणे परिसरातून व विविध भागातून भक्तगण येत असून आज गुरुवार दिनांक ८ मार्च रोजी त्यांच्या संथारा व्रताचा ५४ वा दिवस आहे.
मयुर काॅलनी, कोथरूड येथील जैन श्रावक संघाच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारे दर्शनासाठी येत असलेल्या भक्तगणांची व्यवस्था करण्यात आली असून, दुपारी व संध्याकाळी भक्तगणासाठी संघाच्या वतीने गौतम प्रसादीची व्यवस्था शिवाय प्रत्येकाला प्रभावणा सुध्दा दिली जाते, जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी व गावातील सर्व कार्यकर्ते, महिला मंडळ, युवक मंडळ सर्वजण आदराने आलेल्यांची सेवा करीत असून परिश्रम घेत आहेत, सकाळी आठ ते बारा व दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत फक्त दर्शन दिले जाते, याची सर्वांनी नोंद घ्यावी, व दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी माहिती जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी जामखेड यांनी दिली.



