राहाता (तालुका प्रतिनिधी)- डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल मधील दर्जेदार शिक्षणामुळे या स्कूलला उज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.
येथील डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल च्या चौथे वार्षिक स्नेहसंम्मेलन उडाण व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील बोलत होते. याप्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, शिर्डी एअरपोर्टचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव, सौ. श्रीवास्तव, शासकिय स्विय सहाय्यक समर्थ शेवाळे, साई रुरल इन्स्टिट्युट चे संचालक डॉ. महेश खर्डे, राहाता महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप, स्कूलचे प्राचार्य किशोर निर्मळ, राहात्याचे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, सार्वमतचे तालुका प्रतिनिधी महेंद्र जेजुरकर, गणेश च्या संचालिका नलिनीताई डांगे, विलासराव डांगे, राहुल मापारी या स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य आहे. या स्कूल मध्ये विविध अभ्यासक्रम सुरु होणार आहेत. धनश्रीताई विखे या स्कूल मध्ये वयैक्तिक लक्ष घालत आहेत. आठवीचा वर्ग असताने स्कूल मध्ये विद्यार्थी संख्या चांगली आहे. दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होईल. विखे पाटील इटरनॅशनल स्कूल आणि साई रुरल इन्स्टिट्युटचे नाव विद्यार्थी उज्वल करतील. अल्पावधीत या स्कूल ने चांगला नावलौकिक वाढविला आहे.याप्रसंगी
शिर्डी विमानतळाचे सुशिलकुमार श्रीवास्तव म्हणाले,
सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे कौतुकाने विद्यार्थ्यांना पाटबळ मिळते. या स्कूलने उत्कृष्ट नियोजन करुन कार्यक्रम घेतला. स्कूलचा दर्जा चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या माता या उपस्थित असल्याने आपल्या मुलांचे कौतुक ते पाहातात. असेही ते म्हणाले.
या प्रसंगी प्रास्तविक प्राचार्य किशोर निर्मळ यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात स्कूल राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. सुत्रसंचालन करुन विजय गाढवे यांनी आभार मानले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे, पिंपळसचे माजी सरपंच भारत लोखंडे, विपूल गवांदे, राहुल गव्हाणे, सुरेश जाधव, आण्णासाहेब जाधव, सागर सदाफळ, संदिप लोखंडे, शरद गायकवाड, गोरख दंडवते, दत्तात्रय कुदळे, अनिल लोखंडे, चेतन घोगळ, किरण लहारे, श्रीकांत गाढवे, गणेश घोगळ, अदिंसह पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————–
स्कूल मध्ये विविध उपक्रम राबवून स्कूल परिसरात पुढे आणू, अल्पावधीत स्कूल ने शैक्षणिक दर्जासह चांगली प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी स्कूल प्रयत्न करत आहे. पालकांची चांगली साथ मिळत असल्याने या स्कूलला चांगले भवितव्य आहे.
धनश्रीताई विखे पाटील
—————