जनता आवाज
लोणी दि.२१ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी अतुल निखाडे आणि गौरव शिंदे या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठ स्पर्धेसाठी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषि विश्वविद्यालय हिसार येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघामध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.
या स्पर्धा दिनांक २० ते २४ फेब्रुवारी २०२३ रोजी हिसार येथे संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी अनुक्रमे अतुल निखाडे याची हॉलीबॉल संघात तसेच गौरव शिंदे याची उंच उडी व व १०० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये नुकत्याच झालेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली यामध्ये सदर खेळाडूंची निवड करण्यात आली.
यावेळी सदर विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संचालक कैलास पाटील तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी क्रीडाशिक्षक प्रा. सिताराम वरखड, प्रा.अमोल सावंत यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महसूल मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी अभिनंदन केले.