श्रीगोंदा (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीगोंदा येथे गावठी कट्टा बाळगणारा आरोपी कट्टयासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई केली.
राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दि. 16 रोजी पोनि दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे चंद्रशेखर मखरे, रा.श्रीगोंदा याचेजवळ गावठी कट्टा असुन तो विक्री करण्यासाठी श्रीगोंदा ते पारगाव फाटा जाणारे रोडवर हॉटेल विजय येथे येणार आहे.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे व अरूण मोरे अशांचे पथक तयार करून माहितीची पडताळणी करुन कारवाईच्या आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
दि.16/05/2025 रोजी पथकाने मिळालेल्या माहितीवरून हॉटेल विजय, पारगाव फाटा ते श्रीगोंदा जाणारे रोडवर, श्रीगोंदा येथे जाऊन संशयीत इसमाचा शोध घेऊन तो मिळून आल्याने चंद्रशेखर जयवंत मखरे, (वय 38, रा.मखरेवाडी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीची अंगझडती घेऊन त्याचे ताब्यातुन 40,000/- रू किं.त्यात एक गावठी पिस्टल व 2,000/- रू किं.त्यात 02 जिवंत काडतुस असा एकुण 42,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी हा विनापरवाना गावठी पिस्टल व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्याचेविरूध्द श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 532/2025 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई .राकेश ओला,(पोलीस अधीक्षक) प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,.विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.




