11.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

वडाळा महादेव परिसरात भीषण अपघात  दोघे जखमी 

वडाळा महादेव( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील नेवासा रोड वरील कॉलेज परिसरामध्ये वारंवार अपघात होत असताना दिसत आहे दिनांक १७ रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान डस्टर व दुचाकी पल्सर वाहनाचा अपघात झाला होता यामध्ये दुचाकी वाहन चालकाला डोक्याला मार लागला असून त्यास वैद्यकीय उपचारासाठी लोणी प्रवरा येथे हल्ल्यात आले.

तसेच आज दिनांक १८ रोजी सायंकाळी ८.३० मी एस टी बस एम एच २४ बि टी १४१२ तसेच बोलेरो वाहन एम एच १७ बि डि १३ ११ यामध्ये समोरासमोर धडक होऊन बोलेरो वाहनातील दोन जण जखमी झाले आहेत यांना वैद्यकीय उपचारासाठी श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालय या ठिकाणी करण्यात आले आहे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती स्थानिक नागरिक यांनी मदत कार्य करत जखमी रुग्णांना उपचारासाठी श्रीरामपूर या ठिकाणी हलविण्यात आली तसेच घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी कळविण्यात आली यावेळी पोलीस नाईक किरण टेकाळे यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक

सुरळीत केली सदरची एसटी बस पालघर डेपोची असून शिर्डी कडून  छत्रपती संभाजीनगर कडे जात असल्याची माहिती मिळाली तसेच बोलेरो वाहन हे पिंपळगाव पुणगी राहुरी परिसरातील असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले यामध्ये साहिल शेख वय २३ व परवेज शेख ज्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी करण्यात आले पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!