नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा) :- हल्लीच्या युगात काही चाणक्ष राजकारणी मंडळी आपल्याला राजकारणात साधू – संतांच्या सहवासामुळे जनतेचा जनाधार मिळत असल्याचे हेरुन बहतांशी राजकारणी नेतेमंडळी साधू – संतांना बरोबर एकञित छब्या काढून आपणच कसे धार्मिक कार्यात सहभागी आहोत असा सोंगाडबाज्या कार्यक्रम इतरञ होत असतांना नेवासा तालुक्यात माञ शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मौजे मुरमे येथील प्रवरासंगमरोड ते तपोभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण व काँक्रिटीकरण रक्कम २० लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन प्रत्यक्षात देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करुन शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी आपली श्रद्धा आणि निष्ठा केवळ नावाला नाही तर प्रत्यक्षात कृतीतून दाखवून देवून सोंगाडबाज्या नेत्यांना अप्रत्यक्षरित्या चांगलीच चपराक दिली आहे.
देवगड तपोभुमी ते मुरमे हा रस्ता खडीकरण व कॉंक्रिटीकरण आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर केलेला आहे त्यामुळे देवगडनगरीच्या विकासात मोठी भर पडलेली असून राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी नागरी सुविधा निर्माण केल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचे भाविक – भक्तांतून मोठे कौतुक केले जात आहे राजकारणी मंडळी धार्मिक क्षेञातील साधूसंताच्या सहवासात राहून राजकारणात आपल्याला त्यांचा कसा फायदा होईल याकडे लक्ष डोळा ठेवून असतांना नेवाशात माञ शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी या कामाचे उद्घाटन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या शुभहस्ते करुन आपल्या कृतीने खरी श्रद्धा दाखवून दिल्यामुळे भाविक भक्तांतून आमदार लंघे – पाटील यांचे मोठे कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच अजय साबळे, राजेंद्र काका मते, शिवाजीराव मते पाटील, बाबासाहेब मुरदारे, संदीप साबळे, अर्जुन वरखडे, रमेश गणगे नाना, बबन दादा लंघे,दिलीप दरोडे, प्रवीण लंघे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सयाम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.