आश्वी( जनता आवाज वृत्तसेवा ):-आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रात्री साखर झोपेत असतांनाच अहिल्यानगर जिल्हा च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक दिनेश आहेर व टिमने बळी राजाकृषी सेवा केंद्र (पिंप्रीफाटा), शिबलापुर (ता.संगमनेर) येथुन शेतमालाचे साहित्य तसेच रोकड घेऊन पळालेल्या चोराना मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे.
सविस्तर माहिती आशी की,दि १५ मे राजी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत बळी राजाकृषी सेवा केंद्र ,मालक संदिप पोपट गिते यांच्या दुकानाचा मागुन पत्रा उचकत धाडसी चोरी करत रोकड तसेच शेतमालाचे साहित्ये लप्पास केली होती.याप्रकरणी आश्वी पोलिस ठाणे मध्ये गु र नं १०४/२०२५ नुसार बी. एन. एस. कलम ३०५ (ए),३३१(१) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.आश्वी पोलीस ठाणेचे पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्ह्याची माहीती घेऊ पर्य़त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सापळा लावत मुद्देमाल सह आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यामुळे पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे टिमच्या कामगीरीचे आश्वी परीसरातील नागरीक कौतुक करत आहे.
पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्हयातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पो नि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयुर गायकवाड, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमून घरफोडी गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक २१ मे रोजी पथक वर नमूद घरफोडीच्या गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तीन इसम हे त्यांचेकडील पीकअप गाडी क्र.एमएच २१ बीएच ५४४३ मधुन अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणारे रोडलगत आशिर्वाद मंगल कार्यालयाजवळ शेतीचे औषधे संशयास्पद विकत असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन पंचासमक्ष १ गणेश विठ्ठल आव्हाड, वय 23, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर २. राज संदीप गायकवाड, वय 24, रा.विळद, ता.अहिल्यानगर ३. आदित्य संतोष इंगोले, वय 23, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पथकाने आरोपीचे ताब्यातील पीकअपची पाहणी केली असता त्यामध्ये शेतीचे औषधे व रसायन मिळून आले.पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन ८ लाख ५७ हजार ३९२ रू किं.त्यात महिंद्रा कंपनीचा पीकअप, शेतीचे कीटकनाशक, औषधे व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, व उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर कुणाल सोनवणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.