24.9 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक 

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु झाला आहे. राज्यात आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे असणार आहेत.

गुरुवारी २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या बड्या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधिक्षक मिळाले आहेत.

अर्चित चांडक यांच्याकडे अकोल्याचे पोलिस अधीक्षकपद सोपवण्यात आलं आहे. तर योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. जयंत मीना यांची लातूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाली आहे.

कुणाची कुठे बदली झाली?

कोकण विभागातील रत्नागिरी, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. आंचल दलाल यांची रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदावर तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन बगाते यांचे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. रितू खोकर यांची धाराशिवचे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!