20.6 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

… अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासणार – संपत बारस्कर  एमएससीबीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात राष्ट्रवादीचे मेणबत्ती पेटवून आंदोलन 

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- नगर शहरांमध्ये वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ विद्युत भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातील वीजपुरवठा बंद करून मेणबत्ती पेटून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. पुढील आठ दिवसांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला.

यावेळी माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, प्रकाश भागानगरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, मंगेश खताळ, संजय सपकाळ, दीपक खेडकर, सारंग पंधाडे, जॉय लोखंडे, रंजना उकिरडे, साधना बोरुडे, आरती उफाडे, स्वप्नील ढवन, महेश गलांडे, गिरीश जगताप, राहुल कातोरे, अंकुश बोरुडे, संकेत कराड, अमोल जाधव, भगवान काटे, अभिषेक बोरुडे, परेश पुरोहित, दिनेश लंगोटे, दीपक लिपाने, संकेत झोडगे, सुरेश आडसूळ, अमित खामकर, अशोक चोभे आदी उपस्थित होते.

महावितरण अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

महावितरण कर्मचाऱ्यांनी तोडलेल्या झाडाच्या फादया त्वरीत उचलण्यात येतील, वाकलेले वीज पोल सरळ करण्यात येतील. अतिभारीत असलेले वीज रोहित्राचे ठिकाणी उच्च क्षमतेचे रोहित्र बदलण्यात येतील. तसेच महावितरणच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी भ्रमणध्वनी स्विकारला नाही, तर संबंधीतांवर कंपनीच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे लेखी आश्वासन अधिक्षक अधीक्षक अभियंता पवार यांनी राष्ट्रवादी शिष्टमंडळात दिले

ग्राहकांकडून दंडलशाही पद्धतीने वसुली

शहरामध्ये ग्राहकांकडून दंडलशाही पद्धतीने वसुली केली जाते. मात्र त्यांना व्यवस्थित वीज पुरवठा केला जात नाही. मुळाधरण येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अधिकारी वर्ग एसी लावून थंड वातावरणात बसतात. मात्र नागरिक गर्मीमध्ये आपली रात्र काढत असतात. नागरिकांनी फोन लावल्यानंतर विद्युत विभागाच्या वतीने कधीही फोन उचलला जात नाही. नागरिकांना मुजोर पद्धतीने उत्तरे दिली जातात. पावसाळ्यापूर्वीच दुरुस्तीचे व झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेणे गरजेचे होते. मात्र कुठल्याही उपयोजना न केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

– संपत बारस्कर

वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिक यांची अतोनात हाल होत आहे. पावसाचे थेंब सुरू होण्यापूर्वीच वीज गुल होत असते. आठ दिवसांमध्ये वीजपुरवठा नियमित पणे सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.

– सुरेश बनसोडे

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!