अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्याचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच करू शकतात.शासनाच्या विविध योजना दिव्यांग व्यक्तींसाठी असून त्या पोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते करतील यासाठी राज्यभर दिव्यांग जोडो मोहिमेचा शुभारंभ अहिल्यानगर शहरात झाला आहे. काही लोक दिव्यांग सर्टिफिकेट मिळवून शासकीय नोकरीत समाविष्ट होत आहेत.मात्र खरा दिव्यांग व्यक्ती या नोकरीपासून वंचित राहत आहे. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शासनाला गंभीर दखल घेण्यासाठी भाग पाडू. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरातील दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न मार्गी लागत आहे. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या माध्यमातून मिळणारे मानधन वेळेत व वाढून मिळवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष नीता ताई ढवन यांनी केले.
अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग आघाडी च्या वतीने दिव्यांग जोडो अभियानाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष नीताताई ढवण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, युवक अध्यक्ष इंजि केतन क्षीरसागर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष वैभव ढाकणे.राजेश भालेराव,नितीन घोडके,गणेश बारस्कर,लक्ष्मण पोकळे ,जमीर पठाण,मच्छिद्र खेडकर , बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते
शहरातील सर्वच घटकातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागरिकांमध्ये योजनांची माहिती जनजागृती करीत आहोत. दिव्यांग व्यक्तींच्या व्यथा खूप गंभीर असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक बांधिलकी जोपासत नक्कीच मदतीचा हात देईल.प्रदेशाध्यक्ष नीता ताई ढवण यांच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग व्यक्तीचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाईल असे मत शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी व्यक्त केले.