11.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडेचे पाणी चिंचोलीत दाखल निळवंडेचे पाणी आल्याने नागरिकांमध्ये मोठा आनंद,नागरिकांकडून माजी मंत्री थोरात यांच्या प्रति कृतज्ञता

तळेगाव दिघे(जनता आवाज वृत्तसेवा):- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तळेगाव सह दुष्काळी भागातील जनतेला निळवंडे चे पाणी देण्यासाठी मोठे काम केले. कालव्यांमधून गावागावात पाणी देण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून यंत्रणा देऊन पाणी पोहोचवली असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणाचे पाणी थेट चिंचोली गावात आल्याने नागरिकांमध्ये मोठा आनंद असतो साजरा झाला असून सर्वसामान्य जनतेने लोकनेते थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

निळवंडे धरण हे तळेगाव सह दुष्काळी भागाला वरदान ठरणारे आहे. हे धरण व कालवे पूर्ण करणे हा जीवनाचा ध्यास म्हणून माझी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धरण व कालवे पूर्ण केले. मागील दोन वर्षांमध्ये दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी काम केले. संपूर्ण काम करून ठेवले होते मात्र सत्ता बदलली. तरीही या जनतेला पाणी देण्यासाठी माजी मंत्री थोरात कटिबद्ध राहिले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा व पाईप देऊन विविध गावांसाठी मोठमोठ्या चाऱ्या निर्माण केल्या. यासाठी कारखान्याची यंत्रणा रात्रंदिवस काम करत होती. कर्मचारी जेसीबी पोकलँड यांसह कारखान्याने चर खोदून त्यामध्ये पाईप टाकून दिले आहे.

या चर खोदणीमुळे मागील वर्षीपासून देव कवठे मलढोण सायाळे या गावांना पाणी मिळत आहे. इतर गावांनी ही मागणी केल्यानंतर कारखान्याचे यंत्रणांनी त्यांना मोठी मदत केली.

कालव्यापासून चिंचोली गुरव नदीपर्यंत चार किलोमीटरच्या अंतरा करता मोठी चारी खोदण्यात आली असून दोन बंधारे व तीन नद्या ओलांडून हे पाणी अखेर चिंचोली गावात दाखल झाले आहे. मागील काही वर्षांचे स्वप्न साकार झाल्याने संपूर्ण नागरिकांनी मोठ्या आनंदाने पाण्याचे स्वागत केले असून सर्वत्र दिवाळी साजरी झाली आहे.

यावेळी बोलताना संपतराव गोडगे म्हणाले की, धरण व कालवे तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच पूर्ण केले. ज्यांची आता सत्ता आहे त्यांचे या कामांमध्ये कोणतेही योगदान नाही. नवीन लोकप्रतिनिधीला कालवे आणि गावे सुद्धा माहिती नाही. त्यांचा तर बिलकुल संबंध नाही. सर्वांना पाणी देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात कटिबद्ध असून मागील वर्षी मध्य प्रदेश मध्ये कारखान्याच्या यंत्रणेसह जाऊन त्यांनी पाणी वरच्या भागाला देण्याचा पॅटर्न येथे राबवण्याचे निश्चित केले आहे. ते सर्वांना पाणी देणारच आहेत.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी आल्याचे मोठे समाधान असल्याचे सरपंच विलास सोनवणे यांनी म्हटले आहे.

हे पाणी आणण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह कारखान्याच्या यंत्राने मोठी मदत केली असून नागरिकांनी लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली आहे.

निळवंडेचे पाणी आल्याने गावात दिवाळी

निळवंडे धरणाचे पाणी गावात आल्याचे समजतात गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, बालक , शेतकरी व महिला यांनी पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेतून व कष्टातून आलेले पाणी गावात आल्यानंतर सर्वांनी या पाण्याचे दर्शन घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांना धन्यवाद दिले आहे यावेळी फटाके वाजवून व गुलाल उधळून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!