अकोले :-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठी महसुल विभागाच्या वतीने जी काही मदत लागेल ती मी सर्वेतपरी करणार आहे. या जागेची मोजणी करुन त्याचा नकाशा तयार करा आणि त्याची सिटी सर्वेला नोंद करा. हे सर्व काम माझ्या अंतर्गत आहे. त्यामुळे, शक्यते सहकार्य केले जाईल असे आश्वासन राज्याचे महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आज दि. १६ जाने २०२३ रोजी त्यांनी महात्मा फुले चौकात असणाऱ्या स्मारकाच्या जागेची पहाणी केली. तर, संबंधित जागेची मोजणी करुन आवश्यक कागदपत्र तयार करण्याचे आदेश ना. विखे पाटील यांनी तहसिलदार सतिष थिटे यांना दिले.
यावेळी ना. विखे यांना एक निवेदन देखील देण्यात आले. त्यात म्हटले आहे. की, अकोले शहरात महात्मा फुले चौकालगत पुर्वी बौद्धांची स्माशानभुमी म्हणून ३० गुंठे जागा होती. तेथे काही व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. ते हटविण्यासाठी दि. ५ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रातील हजारो भिम अनुयायी अकोल्यात दाखल झाले होते. आंदोलनाची तिव्रता आणि भावना यांचा विचार करुन भव्य मोर्चाला समर्थन देत अतिक्रमण धारकांनी फार मोठे सहकार्य केले आणि संबंधित जागा मोकळी केली. वास्तवत: आता ती जागा ३० गुंठे नसून सदर जागा, कोल्हार घोटी व देवठाण रोड यात गेली असून उर्वरित जागा १४ गुंठे आहे. तेथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा महापुरुषांचे भव्य स्मारक उभे करायचे आहे. त्यामुळे, भुमिअभिलेख विभागाकडून त्या जागेचा नकाशा आम्हाला प्राप्त होऊन त्या जागेची सीटी सव्हेमध्ये नोंद करणे गरजेचे आहे. तसेच त्याचे प्रॉपर्टीकार्ड मिळून कायदेशीर बाबी पुर्ण होणे अपेक्षित आहे.
तरी, हा सर्व विषय महसुल खात्याअंतर्गत येतो. तहसिलदार आणि भुमिअभिलेख कार्यालय यांनी तातडीने मदत केली. तर, स्मारकाचा मार्ग खुला होईल. महसुल विभागाकडून आम्हाला बर्यापैकी सहकार्य लाभले आहे. मात्र, उपस्थित जागेची मोजणी करुन त्याचा नकाशा देण्यात भुमिअभिलेख कार्यालयाकडून हवे ते सहकार्य मिळत नाही. हे सर्व वाचल्यानंतर महसुलमंत्री विखे पाटील यांनी स्मारकाच्या जागेची पहाणी केली आणि प्रशासनाला आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. यावेळी स्मारक समितीचे विजय वाकचौरे, अरुण रुपवते, अँड. वसंत मनकर, रमेश जगताप, शांताराम संगारे, सुरेश देठे, रमेश शिरकांडे, चंद्रकांत सरोदे, सागर शिंदे, बाळासाहेब साबळे, राजेंद्र गवांदे, दिलीप गायकवाड, सुमनताई जाधव, संतोष देठे, विशाल वैराट, राजू रुपवते, प्रविण देठे, रामनाथ पवार, शिवाजी सातपुते, सलिम शेख, दत्ता नाईकवाडी यांच्यासह टपरीधारक संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.