8.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

अजित पवार बचावले…चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली

बारामती ( जनता आवाज ) :-
विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. बारामती येथील उद्घाटन प्रसंगावेळी ही घटना आहे. थोडक्यात वाचलो अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती, असं वक्तव्य ‘अजित पवार यांनी काल केलंय. नेमकं काय घडलं ते अजित पवार यांनी कार्यक्रमात सांगितलं.
अजित पवार म्हणाले, कुठं बोललो नव्हतो. तुम्ही आता घरचे आहात म्हणून बोलतो. काल मी सकाळी एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. चौथ्या मजल्यावरून लिफ्टमधून जात होतो. तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात होतो. सोबत डॉ. हार्डिकर होते. त्यांचं ९० वर्षे वय आहे. सोबत सेक्युरिटी ऑफिसर होते. लिफ्टमध्ये बसलो. लिफ्ट वर जाईना. तिथचं बंद झाली. नंतर लाईट गेली. अंधार होता. नंतर ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून धाडदिशी खाली आली. खोट सांगत नाही. आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता, असंही त्यांनी म्हटलं. नाहीतर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती सेक्युरिटी ऑफिसरनं दरवाजा तोडला. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. पण, बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितलं नाही. मी घरी पत्नीला पण बोललो नाही. माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालचं ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. तुम्ही घरची माणसं आहेत. त्यामुळं तुम्हाला सांगतो, असंही अजित पवार म्हणाले.
सांगायचं तात्पर्य आपण आपली काळजी घेतली पाहिजे. परमेश्वराची कृपा, तुमचे आशीर्वाद. चौथ्या मजल्यावरून धाडदिशी लिफ्ट आदळली पण आम्हाला काही झालंच नाही, असं सांगितलं. ते स्ट्रेचर देणारे लिफ्ट होते. नंतर आम्ही बाहेर पडलो. हार्डीकर डॉक्टर यांना थोडसं लागलं. मात्र, सर्व सुखरूप आहोत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!