नगर( जनता आवाज वृत्तसेवा):-नगर तालुक्यात खडकी खंडाळा अकोळनेर चास भोरवाडी कामरगाव सारोळा कासार बाबुर्डी बेंद बांबूर्डी घुमट वाळकी व एकुणच संपुर्ण नगर तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला अनेक बंधारे फुटून शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी घुसल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी आ शिवाजीराव कर्डिले यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले असता आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ताबडतोब पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व .परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले .
पालकमंत्र्यांनी त्वरीत आपत्कालीन यंत्रणेला सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले तसेच शेतीच्या व पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई अहवाल तयार करण्यास सांगितले.
गेल्या शंभर वर्षात मे महिन्यात कधीच एवढा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत परंतु शेतकऱ्यांनी घाबरून न जाता झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यास सरकारी यंत्रणांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक मदत करता येईल म्हणून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची आम्हास माहिती दिल्यास त्यावर योग्य कार्यवाही करता येईल शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असे आवाहन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे