25 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल नवंउद्योगांच्या सोबत -ना.राधाकृष्ण विखे पाटील

लोणी दि.१६ प्रतिनिधी 
स्टार्टअप्स साठी  केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल उद्योगांच्या मागे उभे राहील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देशात उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास मदत  होणार आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
     लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवेश ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी प्रवरा रिचर्स इनोव्हेशन स्टार्टअप्स आणि सुक्ष्म लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित स्टार्टअप्स डे निमित्त इनोव्हेटिंग फॉर इंडीया आणि इनोव्हेटिंग फ्रॉम इंडीया अंतर्गत विविध नवं उद्योजकांशी संवाद साधतांना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.  
    यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे तांञिक अधिकारी डॉ. प्रविण कदम, सेन्टींग फ्रिडम टेक्नालॉजी, पुणेयेथील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी विद्यार्थी राहुल हुडेकरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, इनोव्हेशन कॉसिल्सचे अध्यक्ष डॉ. संजय कुरकुटे, समन्वयक डॉ. सुभाष मगर, आयआयटी मुंबई टिगर्स लॅबचे समन्वयक आर. आर भांबारे आदीसह विभाग प्रमुख आणि उद्योजक उपस्थित होते.
     देशात आज स्टार्टअप्सची निर्मिती मोठ्या प्रमाण होत आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पानेला बळकटी देतांना नवोद्योगांनी विविध क्षेत्रात रोजगाराच्या लाखो संधी निर्माण केल्या आहेत. असे ना. विखे पाटील यांनी सांगून ग्रामीण भारत हा लवकरचं उद्योगशील होणार आहे. स्टार्टअप्स च्या माध्यमातून सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना चालना देण्यासाठी शासकीय विविध योजना, विद्यापीठ संशोधन, विविध कंपन्याचे तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून मद्दत ही होत असल्याने राज्यासह ग्रामीण भागात ही नवोद्योगांची संख्या वाढत आहे. असे सांगून प्रवरेच्या या केंद्राचा लाभ घेऊन आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले.
     यावेळी डॉ. प्रविण कदम आणि राहुल हुंडेकरी यांनी थेट संवादातून विविध अडचणी आणि यावर उपायोजना सुचविल्या.  प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी प्रवरा अभियांत्रिकीच्या माध्यमातून सर्वाना नवीन स्टार्टअप्स साठी मार्गदर्शन केले जात आहे. विविध सुविधा त्याना उपलब्ध असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकांत डॉ. संजय कुरकुटे यांनी प्रवरेच्या इनोव्हेशन  संशोधन केंद्राचा आढावा घेत सप्टेंबर 2022 पासून ६३ स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे यामध्ये ग्रामीण युवक, प्राध्यापक, उद्योजक यांचा सहभाग महत्वपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवीन शिक्षण पद्धती नुसार अभियांत्रिकाची वाटचाल सुरू झाली आहे. यावेळी स्टार्टअप्स सुरू करणाऱ्या उद्योजकांचा गौरव ना. विखे पाटील यांनी केला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!