spot_img
spot_img

एकल महिलांच्या प्रकल्पांना सहकार्य करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री विखे यांची मुख्यमंत्री फडवणीसांकडे मागणी

अहील्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची प्रेरणा घेवून जिल्ह्यातील एकल महीलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या  प्रकल्पाकरीता राज्य सरकराने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी केली.

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंती सोहळ्याच्या निमिताने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे यांनी जिल्हयातील एकल महीलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून या महीलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात केलेल्या सर्व्हेक्षणात एक लाख एकल महीलांची संख्या समोर आली असली तरी यामध्ये वाढ होईल.एकल महिलांना अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या प्रकल्पात या महीलांना कौशल्य प्रशिक्षण केंद्राशी जोडण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

चौंडी येथील तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर शहरातही महीला सक्षमीकरणाचे प्रेरणास्थान म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.चार मोठ्या राष्ट्रीय महामार्गाना शहर जोडले गेले असल्याने अध्यात्मिक पर्यटन विकसित होण्यासाठी शहरातील स्मारकाला निधी देण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!