13.8 C
New York
Tuesday, June 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड पाठोपाठ अहिल्यानगरमध्येही गोळीबार

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- सावेडी उपनगरातील तपोवन परिसराततील ढवण वस्तीवर दोन गटात झालेल्या वादातून बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल सांगळे, मयूर फणसे, आकाश नसाने, कुमार मराठे, भीमराज आव्हाड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमी प्रमोद रामदास घोडके (वय.२४ रा. तपोवन, अहिल्यानगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तपोवन परिसरात घडली.

या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याबाबत तिघांना ताब्यात घेतले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!