8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

कृषि उद्योजक विराज जाधव यांना राष्ट्रीय युवा उद्योजक्ता प्रथम पुरस्कारबाभळेश्वर कृषि विज्ञान केंद्रातंर्गत मिळाली प्रेरणा

लोणी दि.१४ प्रतिनिधी
कृषि उद्योजक विराज जाधव यांना राष्ट्रीय उद्योजक्ता 
प्रथम पुरस्कार प्रदान कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर अंतर्गत राबविल्या जाणा-या अँग्री क्लिनिक्स अँड अँग्री बिझीनेस प्रशिक्षणामधून प्रशिक्षित केलेले युवा कृषि उद्योजक श्री. विराज भगीरथ जाधव यांना  राष्ट्रीय उद्योजकतेचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नुकतेच नवी दिल्ली येथे केंद्रिय कृषि  मंत्रालयाच्या सह सचिव सौ. शुभा ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. श्री. विराज जाधव यांनी कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथून अँग्री क्लिनिक्स अँड अँग्री बिझीनेस हे प्रशिक्षण घेऊन शिरसगाव ता. श्रीरामपूर येथे पैस बायोटेक नावाने बियाणे कंपनी सुरू केली आणि गेल्या तीन वर्षापासून या कंपनीद्वारे कांदा व गहू बीजोत्पादन,  बियाणे प्रक्रीया आणि विविध माध्यमातून दरवर्षी जवळपास दोन हजार शेतकऱ्यांना उत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यामधून उत्कृष्ट कृषि उद्योजकतेच्या प्रथम पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आणि त्यांना चाळीस हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, खा.डाॅ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि विश्वस्त  सौ.शालिनीताई विखे पाटील,संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ.सुप्रिया ढोकणे,केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन राष्ट्रीय कृषि विज्ञान संकुल नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. सदर पुरस्कार वितरण संभारंभासाठी केंद्रिय कृषि मंत्रालयाचे सह सचिव, मॅनेज हैद्राबाद येथील महासंचालक, कृषिमंत्रालयाचे सह आयुक्त, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महा प्रबंधक, नाबार्डचे वरीष्ठ मॅनेजर आणि देशभरातून कृषि उद्योजक सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!