इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी येथे पालक मेळावा लोणी दि.१४ प्रतिनिधी
शिक्षणांसोबतचं आदर्श विद्यार्थी घडविणे हा प्रवरेचा ध्यास आहे.शहरी भागातील सुविधा बरोबरचं शिक्षणांसोबत सामाजिक जाणीव निर्माण करतांना आदर्श युवापिढी ही देशासाठी आणि आपल्या पाल्यांचे स्वप्नपुर्तीसाठी प्रयत्न केल्यामुळे प्रवरेचा विद्यार्थी आज जागतिक पातळीवर आहे असे प्रतिपादन कैलास पाटील तांबे यांनी केले.
लोकनेते खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळावासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक कैलास नाना तांबे पाटील उपस्थितीत होते.
यावेळी तांबे पाटील म्हणाले, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये चालविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रम संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत असणारे योगदान याचे महत्वपुर्ण आहे. शिक्षण संस्था ही दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये देशभरात अग्रेसर राहिलेली आहे. आज प्रवरेचे माजी विद्यार्थी जगामध्ये चांगल्या पदावर नोकरी करत आहे आणि हे माजी विद्यार्थी आज नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम करत आहे .पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ,पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेल्या या शैक्षणिक संकुलाचे वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे असे सांगून संस्थेचे अध्यक्ष महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे माजी विद्यार्थ्यां प्रति असलेली आपुलकी ही संस्थेच्या दर्जेदार शिक्षण देण्यात उपयुक्त ठरत आहे.
प्रारंभी प्राचार्य डाॅ.रविंद्र जाधव यांनी प्रवरा परिवातील विविध संस्थाची माहीती देतांनाच उपक्रम आणि सुविधांची माहीती दिली.याप्रसंगी फार्मसी इन्स्टिट्यूशन चे संचालक डॉ. एम.पाटील सर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस श्रीरामपूरच्या संचालिका सौ. सिद्धी लुक्कड ,विभाग प्रमुख प्राध्यापक दत्ताञय थोरात ,कार्यक्रम समन्वयक प्रा. समृद्धी पाटील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.