21 C
New York
Sunday, August 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासा एस टी आगाराला जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील-आ. विठ्ठलराव लंघे नेवासा एसटी आगारास मिळालेल्या पाच नवीन बसेसचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते उदघाटन

नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा एस.टी.आगारास नव्याने  मिळालेल्या पाच नवीन लालपरी बसेसचे उदघाटन आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले.शहरी व ग्रामीण भागाला जोडणारी लालपरी हे एकमेव साधन असून नेवासा तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी डेपोला जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.

प्रवाशांना अधिक चांगली व सुलभ वाहतूक सेवा उपलब्ध होऊन ग्रामीण भागाला जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला बळ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्या सहकार्याने नेवासा तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार नेवासा एसटी आगारास मिळालेल्या पाच नवीन बसेसच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील हे होते.

यावेळी झालेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार डॉ.संजय बिरादार,पोलीस निरीक्षक धनंजय जाधव,माजी सभापती शंकरराव लोखंडे,पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकरकाका शिंदे,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,शिवसेनेचे नेवासा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब वाघ,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,निरंजन डहाळे,युवा नेते ऋषिकेश शेटे,इंजिनियर सुनीलराव वाघ,शिवसेनेचे युवा नेते अभिजित पोटे,नेवासा प्रवासी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, युवा सेनेचे तालुका प्रमुख अजय डौले,डॉ.करणसिंह घुले, भाजपचे युवा नेते मनोज पारखे,अजितसिंह नरुला, माजी सरपंच सतीश गायके,बस स्थानक प्रमुख ज्ञानेश्वर मुरदारे,विमा कंपनीचे अधिकारी किशोर गारुळे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी नेवासा आगाराचे व्यवस्थापक प्रशांत होले यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील यांनी नेवासा हे तिर्थक्षेत्राची भूमी असल्याने अधिकाधिक गाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही मागणी केली असल्याचे सांगितले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी देखील दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा तसेच नेवासा एस टी आगारातील चालक वाहक कामगार यांच्या प्रश्नांसंदर्भात ही लक्ष घालण्याचे आवाहन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा नेवासा आगाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की नेवासा तालुका ही तिर्थक्षेत्राची भूमी असल्याने मी वीस गाडयांची मागणी केली होती मात्र पहिल्या टप्प्यात पाच गाड्या उपलब्ध झाल्या दुसऱ्या टप्यात जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध कशा होतील यासाठी प्रयत्न केला जाईल तसेच एस टी आगारातील चालक वाहक तांत्रिक कामगार यांचे प्रश्न तसेच डेपोतील गैरसोयी बाबत लक्ष घालण्याचा प्रयत्न केला जाईल, नेवासा तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरविला जाईल व सर्वांना बरोबर घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.

यावेळी झालेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी नेवासा प्रेस क्लबचे मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे,अँड.अशोक कर्डक, अध्यक्ष मोहनराव गायकवाड,भास्कर कणगरे,राजेंद्र मते,निरंजन डहाळे, शिवसेना ओबीसी सेलचे प्रमुख अमोल घोडके,अल्ताफ पठाण,रहेमान पिंजारी,एस टी आगाराचे राकेश सोनवणे, राजेंद्र मुथ्था, राजेश कडू,आम आदमी पार्टीचे अँड. सादिक शिलेदार,संदीप आलवणे,विठ्ठल मैदाड,अनिल शिंगी,बंडू शिंदे,सचिन कडू,पोपट शेकडे,महायुती मीडिया प्रमुख आदिनाथ पटारे,ज्ञानेश्वर जाधव,अंबादास रोडे,आ. लंघे यांचे स्वीय सहायक सुनील मोरे, एस डेपोचे कर्मचारी ताराचंद फोलाणे,रमेश दाणे,ज्ञानदेव आगळे,मोहन मोरे, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नेवासकर नागरिक प्रवासी उपस्थित होते.एस टी आगाराचे वासुदेव आव्हाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!