23 C
New York
Saturday, June 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

बेलापूर बुll ग्रामपंचायतीने केली ऐतिहासिक विक्रमी कामगिरी ना. राधाकृष्ण  विखे पा. यांचे सहकार्याने १००१ घरकुलांना मंजुरी

बेलापूर(जनता आवाज वृत्तसेवा):- ना. राधाकृष्ण विखे पा, तसेच. डॉ. सुजय विखे पा.यांच्या विशेष सहकार्याने तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे मा.उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे प्रयत्नातून मोदी आवास योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी बेलापूर-ऐनतपूर येथील तब्बल १००१ नागरिकांना घरकुले मंजूर होण्याची ऐतिहासिक विक्रमी कामगिरी केल्याची माहिती सरपंच सौ.मिना साळवी व उपसरपंच सौ.प्रियंका कु-हे यांनी दिली. बेलापूर-ऐनतपूर येथील गरजू नागरिकांना मोदी आवास योजने अंतर्गतच्या घरकुलांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी शरद नवले,अभिषेक खंडागळे, माजी सरपंच स्वाती अमोलिक, माजी उपसरपंच मुस्ताक शेख,तबसुम बागवान, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता.यासंदर्भात ना.विखे पा. यांचे सहकार्याने ग्रामविकास मंञी  जयकुमार गोरे यांचे समवेत बैठकही झाली होती.या बैठकीत घरकुलांबाबत सविस्तर चर्चा होवून प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली होती.अखेर या प्रयत्नास यश येवून बेलापूर ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी एक हजार एक घरकुलांना मंजुरी मिळाली.हा घरकुल मंजुरीचा आजवरचा विक्रम आहे.

सदरची मंजुरी मिळाल्याने एक हजार कुटुंबाच्या हक्काच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.सदरच्या मंजूर घरकुलांं पैकी ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नाही त्यांच्यासाठी साठी नामदार विखे पा. महसूल मंञी असताना त्यांनी शेती महामंडळाची जमिन ग्रामपंचायतीला मोफत दिली आहे.याच जमिनीवर सर्व सुविधायुक्त घरकुल वसाहत साकारली जाणार आहे.

सदरच्या एक हजार एक घरकुलांच्या प्रस्तावास मंजुरी देवून बेलापूर-ऐनतपूर येथील गरजू नागरिकांच्या घराची स्वप्नपूर्ती केल्याबद्दल ना.राधाकृष्ण विखे पा., डॉ. सुजय विखे पा. यांना शरद नवले,अभिषेक खंडागळे,सरपंच मिना साळवी, उपसरपंच प्रियंका कु-हे,माजी सरपंच स्वाती आमोलिक,माजी उपसरपंच मुश्ताक शेख,तबसुम बागवान,ग्रामपंचायत सदस्य उज्वला कुताळ,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे,सुशिलाबाई पवार यांचेसह घरकुलाचे लाभार्थींनी धन्यवाद दिले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!