11.6 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रमदान सर्वश्रेष्ठ..चला एक होऊ या.. गावांसाठीसात्रळ महाविद्यालयाचे एनएसएस शिबिरातून संदेश

सात्रळ, द १२  प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील धानोरे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
        ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित केलेल्या शिबिरास  माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  विश्वासराव कडू पाटील, ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, ॲड. आप्पासाहेब दिघे पाटील,बाळासाहेब दिघे, प्राचार्य   प्रभाकर डोंगरे, अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदीप दिघे, प्राचार्या डॉ. विद्या वाजे, सरपंच शामू बाळू माळी आदींनी भेटी देत संवाद साधला.
      शिबिरामधील १५० सहभागी स्वयंसेवकांनी धानोरे, सोनगाव स्मशानभूमी परिसर स्वच्छता केली. श्री स्वामी समर्थ केंद्र, गोरक्षनाथ व धनेश्वर मंदिर परिसर विद्यार्थ्यांनी कचरा मुक्त करून वृक्ष लागवड केली. शिबिर काळात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत व्यक्तिमत्व विकास घडवणारे विचार अमृतवाणी व्याख्यानमालेतून स्वयंसेवकांनी देण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिवार फेरी, ग्रामस्थ भेटी आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमातून गावकऱ्यांशी संवाद साधला.
    शिबिर अहवाल वाचन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड यांनी केले. विद्यार्थी पुरस्काराची घोषणा कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. निलेश कान्हे यांनी केली. कार्यक्रमाधिकारी प्रा. आर. बी. मोरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. लतिका पंडुरे आणि डाॅ.नवनाथ शिंदे यांनी केले.
          कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, सह. कार्यक्रमाधिकारी डॉ. गंगाराम वडीतके, प्रा. गोरक्षनाथ बोर्डे, डॉ. गजानन मांढरे, प्रा. निशा खरात, प्रा. एस. पी. कडू, प्रा. डी. एन. घाणे, कु. सायली हारदे, शुभांगी शिंदे यांनी परिश्रम घेतले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!