सात्रळ, दि. १२ : राहुरी तालुक्यातील धानोरी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. श्री. विश्वासराव कडू पाटील, ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे पाटील, प्राचार्य प्रो (डॉ.) प्रभाकर डोंगरे, प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे, प्राचार्या डॉ. विद्या वाजे, सरपंच श्री. शामू बाळू माळी यांच्या हस्ते झाले.
शिबिरामधील १५० सहभागी स्वयंसेवकांनी धानोरे, सोनगाव स्मशानभूमी परिसर स्वच्छता केली. श्री स्वामी समर्थ केंद्र, गोरक्षनाथ व धनेश्वर मंदिर परिसर विद्यार्थ्यांनी कचरा मुक्त करून वृक्ष लागवड केली. शिबिर काळात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत व्यक्तिमत्व विकास घडवणारे विचार अमृतवाणी व्याख्यानमालेतून स्वयंसेवकांनी देण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिवार फेरी, ग्रामस्थ भेटी आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमातून गावकऱ्यांशी संवाद साधला.
समारोप समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मा. श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. मस्के पाटील म्हणाले, विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय असावे. बोलण्याची कला अवगत करा. नाविन्याचा ध्यास धरा. विद्यार्थी जीवनात स्वयंशिस्त गरजेची असून गुणवत्ता महत्त्वाची आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा सहकारी बँकेचे संचालक मा. प्रा. बाळासाहेब दिघे हे उपस्थित होते. याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्वच मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर डोंगरे यांनी केले. शिबिर अहवाल वाचन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड यांनी केले. विद्यार्थी पुरस्काराची घोषणा कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. निलेश कान्हे यांनी केली. कार्यक्रमाधिकारी प्रा. आर. बी. मोरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. लतिका पंडुरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, सह. कार्यक्रमाधिकारी डॉ. गंगाराम वडीतके, प्रा. गोरक्षनाथ बोर्डे, डॉ. गजानन मांढरे, प्रा. निशा खरात, प्रा. एस. पी. कडू, प्रा. डी. एन. घाणे, कु. सायली हारदे, शुभांगी शिंदे यांनी परिश्रम घेतले.