8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट.

प्रतिनिधी (लोणी) पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत जाधव प्रेरणा धनंजय यांनी डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले “रुटा ग्रेव्होलेन्स एल पासून हर्बल औषधांची निर्मिती आणि विकास” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करत असताना हर्बल औषधांची निर्मिती आणि त्यांचा विकास या अनुषंगाने नाविन्यपूर्ण संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली आहे. आपल्या संशोधनामध्ये प्रेरणा जाधव यांनी “रुटा ग्रेव्होलेन्स एल” या वनस्पतीच्या माध्यमातून हर्बल औषधांची निर्मिती करत असताना या औषधांचा विविध उपचारांसाठी उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीचे संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाच्या अनुषंगाने डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांनी पुढे आणखी सखोल व नाविन्यपूर्ण संशोधन करत हर्बल औषधांची निर्मिती व विकास कसा होत जाईल व त्याचा मानवी जीवनासाठी व आरोग्यासाठी कसा उपयोग होईल यासंदर्भात संशोधन केले. व या संशोधनावर आधारित पेटंट मिळवण्यासाठी अर्ज सादर केला. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांना नुकतेच पेटंट मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. नाविन्यपूर्ण संशोधन करून पेटंट मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
त्यांच्या या संशोधकीय कार्याबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी  अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे अतिरिक्त सचिव डॉ. शिवानंद हिरेमठ व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!