कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत श्री भगवतीमाता यात्रोत्सवामध्ये खूप दिवसांच्या अंतराळानंतर टांगा – बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. भरघोस बक्षिसांचा वर्षाव अन हजारोंच्या रसिक शौकीन प्रेक्षकांच्या उपस्थितीत या शर्यती रंगल्या.
कोल्हार – लोणी रस्त्यालगतच्या एका शेतामध्ये झालेल्या या शर्यतीमध्ये नगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगांव आदी जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यातून उत्साही शेतकरी व टांगा शौकिनांनी यात सहभाग नोंदविला. शर्यती पाहण्यासाठी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
विजयी टांगा बैल गाड्यांना ५०० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत रोख बक्षिसे देण्यात आली. सोबत भेटवस्तू स्वरूपात ५ पंखे, ३ सायकल, ३ मिक्सर, ३ पितळी तोळे, ५ किटल्या भगवतीमाता यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आल्या. अनेक वर्षानंतर या शर्यती असल्याने हजारो शौकिनांनी याचा आनंद लुटला.