18.7 C
New York
Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

निवृत्तीनाथ पायी पालखी दिंडीचे लोणीत स्वागत पालकमंत्री ना.विखे पाटील यांच्या पुढाकारातून पायी वारीसाठी उत्कृष्ट नियोजन 

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-मुखी हरीनामाचा जयघोष …आणि लाडक्या विठूरायांची मनी अस असलेल्या भक्तांचा महामेळा अर्थात विश्वगुरु श्री निृवत्तीनाथ पायी पालखी दिंडीचे बुधवारी सहकारी पंढरी लोणी आगमण झाले. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने वरद विनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी पालखीचे स्वागत करून भाविकांशी संवाद साधला ग्रामस्थांच्या वतीने यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यात येणाऱ्या दिंड्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याबरोबरच जिल्ह्यात आल्यानंतर उत्कृष्ट नियोजन असल्याची प्रतिक्रिया श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे पायी दिंडी पालखी प्रमुख ह.भ.प नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी व्यक्त केली 

मजल दरमजल करत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून पंढरपूरकडे निघालेली विठूरायाच्या दिंडीचे लोणी या ठिकाणी भक्तीमय वातावरण स्वागत करण्यात आले जवळपास ५५ दिंड्या आणि पन्नास हजार भाविकांचा लवाजमा सोबत विठ्ठलाचे भजन… टाळ मृदुंग गजर …कपाळी केशरी गंध …देवा तुझा मला छंद…भगवी पताका असा हा भक्तीचा सागर सकाळी दाखल झाला आणि संपुर्ण लोणी-राजुरी हा रस्ता हरीनामाने भक्तीमय झाााला. हरिनामाच्या जयघोषात भक्तिमय झाला. गोगलगांव मुक्कामी असलेल्या दिंडीत रणरागिंणी महिला मंडळाच्या अध्रक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांनी भेट देत भाविकांशी संवाद साधला. सकाळी लोणीत येतांच लोणी खुर्द,लोणी बुद्रुक आणि बाभळेश्वर येथे भाविकांची सेवा करतांना हम सब एक है ची प्रचिती भाविकांनी दिली माऊली चहा घ्या..माऊली फराळ घ्या…नाष्टा करा अशी विनंती यानिमित्ताने तरुणाईसह भजनी मंडळ करत होते.लोणी पोलिसांसह सर्वच जण आज या भक्तीसागरांत तन मन धनाने सहभागी झाले होते.हजारो वर्षाची परंतरा असलेल्या या दिंडीत वारक-यांची दुसरी अन तिसरी पिढीचा सहभाग आहे.हजोरो वाहने,अनेक दिंड्याचा सहभाग,पाणी पुरवठा,आरोग्य पथक,पोलिस पथक या बरोबरचं वेगवेगळ्या समित्या असा हा भक्तीचा मेळा कुणाचं कुणाचे रक्तांचे नाही पण केवळ माऊली म्हणतं एकमेकांची काळजी घेणारे जिवांभावाची आपली माणसे अशी दिंडी पाहताक्षणी क्षणभर का होईना यांत सहभागी होण्याची आस हाच अनुभव अनेकांनी आज घेतला. दिंडी राजुरी या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.

पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगर्डे,नारायण महाराज मुढाल,जयंत महाराज गोसावी,मोहन महाराज बेलापूरकर,बाळकृष्ण महाराज डावरे यांचा समावेश आहे. यावेळी यावेळी ह.भ.प भरत महाराज धावणे, किसन विखे,कल्पना मैड, गणेश विखे, बाळासाहेब विखे, अशोक धावणे,दादासाहेब म्हस्के, प्रवीण विखे, भाऊसाहेब विखे, एन.डी. विखे,अनिल विखे,राहुल धावणे आदी उपस्थित होते.

निवृत्ती महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या पाठीशी आजपर्यंत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे भक्कमपणे उभे राहिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने भाविकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अहिल्यानगर मध्ये दिंड्यांसाठी विशेष सुविधा मंत्री विखे पाटील यांनी दिल्याने यावर्षीचा दिंडी सोहळा हा अधिक सुखकर झाला आहे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर हा मार्ग पालखी मार्ग व्हावा अशी अपेक्षाही यावेळी पालखी प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी व्यक्त केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!