शेवगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी पोलिसांचे विशेष पथक तयार करुन सदर पथकाला जिल्हयांमध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, यांच्या विशेष पथकाने मंगळवारी् दि १७ रोजी संध्याकाळी साडेदहाच्या सुमारास शेवगांव शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, महाराष्ट्र राज्यात तंबाखुजन्य पदार्थाचे विक्री व तयार करणास प्रतिबंध असताना इसम नामे खलील नबिब शहा अल्ताफ पठाण दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला जामा मशीद शेवगांव , कुणाल संजय पिसाळ रा. भगतसिंग चौक शेवगांव शहाबाज ताहेर खान पठाण आफताब ताहेरखान पठाण दोघे रा बंधन लॉन्स शेवगांव असे राहते घरात गिरणीचे सहाय्याने कच्ची व पक्की सुपारीमध्ये संगुधीत तंबाखु मिसळुन मावा करुन विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ विशेष पोलीस पथक व पंच यांना बोलावुन खाजगी वाहनाने रवाना करून वेगवेगळया ठिकाणी पंचासमक्ष छापे टाकले असता सदर आरोपींच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असे खादयपदार्थ,सुगंधीत तंबाखु, मावा तयार करण्याचे मशीन / गिरणी असा एकुण ३,९८,६०० /- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आला.
तसेच खलील नबिब शहा, अल्ताफ पठाण दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला जामा मशीद शेवगांव, कुणाल संजय पिसाळ रा. भगतसिंग चौक शेवगांव ,शहाबाज ताहेर खान पठाण , आफताब ताहेरखान पठाण दोघे रा बंधन लॉन्स शेवगांव यांचे विरुध्द पोकॉ १९३४ प्रशांत चंद्रकांत आंधळे यांचे फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३,२७४, २७५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असताना मात्र स्थानिक पोलिसांचे मात्र दोन नंबर धंद्यावाल्यांशी असलेले लागेबांधे उघड झाले आहेत.