spot_img
spot_img

नवीन विकास आराखड्यात जिल्ह्यातील दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार- नामदार राधाकृष्ण विखे पाटील

लोणी दि. ७ ,प्रतिनिधी 
 ग्रामीण भागाच्‍या विकासासाठी नवनिर्वाचित पदाधिका-यांना मोठी संधी आता मिळाली आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारचे पाठबळ तुमच्‍या पाठीशी आहे. योजनांसाठीचा निधी उपलब्‍ध होण्‍यात कोणतीही अडचण नाही, त्‍यामुळेच कामातून विश्‍वास संपादन करा असे आवाहन करतानाच जिल्‍ह्याच्‍या नव्‍या विकास आराखड्यात १० हजार तरुणांना  रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याचे उदिष्‍ठ ठेवण्‍यात आले असल्‍याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.
       मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत राहाता, राहुरी, आश्‍वी मंडल आणि संगमनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींमध्‍ये विजयी झालेल्‍या  पदाधिका-यांचा सन्‍मान करण्‍यात आला. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के  पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जेष्‍ठनेते शाळीग्राम होडगर, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, भाजयुमोचे सतीष बावके, विश्‍वासराव कडू, अशोकराव म्‍हसे, संगमनेर तालुका अध्‍यक्ष सतिष कानवडे यांच्‍यासह विविध संस्‍थाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

       आपल्‍या भाषणात मंत्री ना.विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशातील ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. राज्‍यातही शिंदे फडणवीस सरकारच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील योजनांना निधीची उपलब्‍धता होत आहे. यासर्व निर्णय प्रक्रीयेचा परिणाम ग्रामपंचायत निवडणूकीत दिसून आला. लोकांनी विश्‍वासाने भारतीय जनता पार्टीच्‍या उमेदवारांना वि‍जयी केले. सर्वांधिक ग्रामपंचायतींमध्‍ये यश मिळविणारा पक्ष म्‍हणून भाजपा राज्‍यात एक नंबरला असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.
       नवीन सरपंच आणि सदस्‍यांना काम करण्‍याची मोठी संधी आहे. यासाठी लोकांचा विश्‍वास संपादन करुन, गावात निर्णय प्रक्रीया राबविण्‍याचे आवाहन करुन, ना‍.विखे पाटील म्‍हणाले की, मुलभूत गरजांना प्राधान्‍य देण्‍यासाठी काम करावे लागेल. केंद्र सरकारच्‍या  जलजीवन मिशन अंतर्गत मोठे काम सुरु झाले आहे. जिल्‍ह्यात ४ हजार ३२ कोटी रुपयांच्‍या योजनांना यापुर्वीच मंजुरी देण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. जिल्‍ह्यात रोहीत्रांचा प्रश्‍न निर्माण झाल्‍यानंतर रोहीत्रांसाठी आमदार निधीतून निधी उपलब्‍ध करुन देणारा शिर्डी मतदार संघ हा आपला एकमेव मतदार संघ असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
नवीन सरपंच आणि सदस्‍यांना काम करण्‍याची मोठी संधी आहे. यासाठी लोकांचा विश्‍वास संपादन करुन, गावात निर्णय प्रक्रीया राबविण्‍याचे आवाहन करुन, ना‍.विखे पाटील म्‍हणाले की, मुलभूत गरजांना प्राधान्‍य देण्‍यासाठी काम करावे लागेल. केंद्र सरकारच्‍या  जलजीवन मिशन अंतर्गत मोठे काम सुरु झाले आहे. जिल्‍ह्यात ४ हजार ३२ कोटी रुपयांच्‍या योजनांना यापुर्वीच मंजुरी देण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. जिल्‍ह्यात रोहीत्रांचा प्रश्‍न निर्माण झाल्‍यानंतर रोहीत्रांसाठी आमदार निधीतून निधी उपलब्‍ध करुन देणारा शिर्डी मतदार संघ हा आपला एकमेव मतदार संघ असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
       जिल्‍ह्याच्‍या पाणीप्रश्‍नाबाबतही आपण प्राधान्‍यक्रम असून, यापुर्वी ज्‍यांच्‍यामुळे समन्‍यायी पाणीवाटप कायदा आला त्‍यांनी जिल्‍ह्याच्‍या  पाण्याबाबत गांभिर्याने भूमिका न घेतल्‍यामुळेच हक्‍काचे पाणी गेले. कुकडीच्‍या पाण्‍याबाबत‍ही जिल्‍हृयावर असाच अन्‍याय झाला. याकडे लक्ष वेधून मंत्री ना‍.विखे पाटील म्‍हणाले की, जिल्‍ह्याच्‍या या प्रश्‍नांबाबत व्‍यापक दृष्‍टीकोन न ठेवल्‍यामुळेच अन्‍याय सहन करावा लागला ही परिस्थिती आपल्‍याला बदलायची आहे.
हा जिल्‍हा माफीयांच्‍या ताब्‍यातून सोडवायचा आहे. कोणी कितीही मोर्चे काढले तरी, शासनाचा महसूल बुंडविणा-यांना प्रायचित्‍त भोगावेच लागेल असा इशारा देत दगडखाणी आणि वाळुमुळे कोणत्‍याही शासकीय प्रकल्‍पाचे काम बंद पडलेले नाही. या माफीयांनीच शासनाची फसवणूक करुन, महसूलही बुडविला. सामान्‍य माणसाला ५०० रुपये दराने वाळू उपलब्‍ध करुन देण्‍याचे धोरण आपण घेणार असून, निळवंडे कालव्‍यांचे कामही सुरु झाले असून, मार्च २०२३ मध्‍ये  प्रधानमंत्र्यांच्‍या हस्‍ते या प्रकल्‍पाचे उद्घाटन होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
       गावाच्‍या विकासाबरोबरच तरुणांच्‍या हाताला काम देण्‍यास आपण प्राधान्‍य दिले असून, या जिल्‍ह्यातील असंख्‍य भुमीपूत्र यशस्‍वीपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्‍ये देशात आणि परदेशात काम करीत आहे. या सर्वांच्‍या सहकार्याने जिल्‍ह्यात औद्योगिक वातावरण तयार करण्‍याची सुरुवात झाली असून, सर्व औद्योगिक वसाहती आणि शासनाच्‍या  मोकळ्या जागांमध्‍ये उद्योग उभारणीवर लक्ष केंद्रीत करण्‍यात आले असल्‍याची माहीती ना.विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात दिली. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, शाळीग्राम होडगर, आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांचीही भाषणे झाली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!