26 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासातील गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करांवर छापा नऊ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल; 75 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त 

नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील प्रमुख पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त माहितीदाराकडून सविस्तर माहिती मिळाली असता दि. 25 जून 2025 रोजी नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर सिनेस्टाईल पद्धतीने छापा टाकून धडक कारवाई केली.

विशेष पोलीस पथकातील कारवाईत 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि 5 ब्रास वाळूसह एकूण 75 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावेळी नेवासा पोलीस ठाण्यात प्रविण नामदेव म्हस्के (रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), विशाल दत्तात्रय ठोंबरे (वय २३, रा. गोधेगाव ता. नेवासा), अभिषेक भिमराज जाधव (वय २३, रा. गोधेगाव ता. नेवासा), राजेंद्र गोलांडे (रा. गोधेगाव), दिलीप शेलार (रा. गोधेगाव), कृष्णा पुनमसिग परदेशी (रा. नेवासा खुर्द ता. नेवासा), कल्याण उन्हाळे (रा.प्रवरासंगम), काका पठारे (रा. धामोरी) यांच्यावर कारवाई केली असून या 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून यापैकी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा शोध पोलीस करत आहे.

पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी वेशांतर करून संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ वाळू वाहतुकीवर प्रथम कारवाई केली आणि काही मिनिटांतच गोधेगाव गाठत दुसरी मोठी कारवाई करून वाळू तस्करांना चांगलाच दणका दिला. ही कारवाई गोधेगावात साठवलेल्या वाळूवर महसूल विभागाच्या सहकार्यानेही करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी नेमलेल्या अहिल्यानगरच्या विशेष पथकातील परिवीक्षाधिन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, सपोहेको शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ दिगंबर कारखिले, पोहेकॉ मल्लिकार्जुन बना पवार, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ सुनिल कांचळे, यांच्या पथकाने केली.

विशेष पोलीस पथकाची अवैध धंदे चालकांत धास्ती

गोधेगावातील कारवाईनंतर स्वतः पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी वेशांतरात ट्रॅक्टर चालवत वाहने जप्त केली. त्यांच्या या धाडसी आणि चपळ कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाळूतस्करीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यात विशेष पोलीस पथकाची धास्ती पुन्हा एकदा अवैध धंदे चा वलकांमध्ये पसरली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!