29.5 C
New York
Monday, June 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

पारनेर तालुक्यातील डाळींब बागांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पोटच्या मुलीप्रमाणे डाळींब शेती करणाऱ्या शेतकरी डोळ्यात तेल घालून करतोय शेताची राखण

पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- सध्या शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकाला बाजारपेठेमध्ये विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळत आहे , शेतकऱ्यांच्या या कष्टाच्या पैश्यावरच काम धंदा न करता ऐशोरामी जीवन जगणारे चोरटे पारनेर तालुक्यात डाळींब सक्रिय झाले आहेत . डोळ्यांत तेल घालून शेताची राखण करण्यात रात्रीचा दिवस करतोय .

पारनेर तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व आर्थिक झळ सोसत शेतात डाळींबाची शेती बाग बहरली आहे . डाळींबाची लागवड करण्यासाठी शेताची मशागत करणे , लागवडीसाठी महागडे रोपे आणून ती लावणे , खते घालणे , औषधे फवारणी ते डाळींब झाडांचे योग्य पद्धतीने संगोपन करणे व आलेले डाळींब फळांची निगा राखणे , एवढे महाकष्ट करून तोडणीस आलेले डाळींब फळे बाजारात विक्री करून आपल्या कष्टाचे चीज करून योग्य तो मोबदला पदरात पाडून , तो कुटुंबासाठी कारणी लावणे , हे प्रत्येक डाळींब उत्पादक शेतकऱ्याचे स्वप्न असते , पण दुसऱ्याच्या जीवावर जगणारे व मजा मारणारे चोरटे मात्र , शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली डाळींब शेती , रात्री च्या अंधारात येऊन डाळींब फळे चोरून नेऊन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याच्या घटना पारनेर तालुक्यात राजरोस पणे घडल्याचे दिसू लागली आहेत .

या संदर्भात संबंधीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी जरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली , तरी त्याचा काही फायदा होईलच , असे नाही . पोलीस प्रशासनाने तत्काळ या डाळींब चोरांचा बंदोबस्त करावा व तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा , अशी मागणी पुढे येऊ लागली आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!