राहुरी फॅक्टरी(जनता आवाज वृत्तसेवा):-देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी काल रविवारी रात्री शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विखे समर्थक म्हणून ओळख असलेल्या गणेश भांड यांची शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती. त्यानुसार काल हा प्रवेश सोहळा मंत्री उदय सावंत यांच्या निवासस्थानी पार पडला.
यावेळी जुन्नरचे आ.शरद सोनवणे,आ. मनीषा कायंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, शिवसेना अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव,पांडुरंग महाराज वावीकर, शहरप्रमुख गंगाधर सांगळे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचा पंचा घालून गणेश भांड यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी संदीप भांड, गोपाल शिंदे प्रमोद बर्डे, संतोष येवले, संतोष घाडगे, कृष्णा भुजाडी, अर्जुन शेटे,चांगदेव खांदे, सुनील भांड, निलेश कुंभार,प्रतीक घोलप,गौरव भांड, सुमेध भांड,सोमा इथापे,सलीम शेख, कृष्णा कोबरणे,किशोर मोरे,अशोक गावडे, राजेंद्र सांगळे, सीताराम येवले, हरिभाऊ हापसे,रवींद्र बोरुडे, किरण देशमुख आदींसह कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.